
स्थैर्य, सातारा, दि. 19 डिसेंबर : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात महाराष्ट्र वन विभागामार्फत व्याघ्रिणी एसटीआर -05 (तारा) हिचे नमर्गिक जंगलात यशस्वीपणे मुक्तसंचार करण्यात आला. शास्त्रीय पद्धतीने राबविण्यात आलेल्या सॉफ्ट रिलीज प्रक्रियेच्या यशस्वी पूर्ततेनंतर. गुरुवारी सकाळी व्याघ्रिणीने सॉफ्ट रिलीज पिंजर्यातून बाहेर पडत चदालीच्या कोअर जंगलात प्रवेश केला.
व्याघ्रिणी एसटीआर -05 (तारा) हिला शनिवार, दि. 13 डिसेंबर रोजी मुक्ततेसाठी पिंजर्याचे दर्वाजे उघडण्यात आले होते. मात्र ती काही दिवस पिंजर्याच्या परिसरातच वावरत होती. या कालावधीत तिने स्वतः शिकार करून तीन दिवस ती खात राहिली. तिच्या नैसर्गिक वर्तनातूनती जंगलात स्वतंत्रपणे जगण्यासाठी पूर्णतः सक्षम असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अखेर आज ती कोअर जंगलात निघून गेली.
वनाधिकारी व वन्यजीव तज्ज्ञांनी सॉफ्ट रिलीज कालावधीत व्याघ्रिणीच्या वर्तन, आरोग्य व परिसराशी जुळवून घेण्याच्या क्षमतेचे सातत्याने निरीक्षण केले. पशुवैद्यकीय तपासणीनंतर तिला नैसर्गिक जंगलात मुक्त करण्यासाठी शारीरिक व वर्तनात्मकदृष्ट्या योग्य असल्याचे निश्चित करण्यात आले.
यात्रावत माहिती देताना क्षेत्र संचालक तुपार चव्हाण (भा.व.से.) म्हणाले, व्याघ्रिणी एसटीआर -05 (तारा) हिने सॉफ्ट रिलीज कालावधीत अत्यंत उत्तम नैसर्गिक वर्तन प्रदर्शित केले आहे. पिंजर्यात स्वतः शिकार करून तिने जंगलात स्वतंत्र जीवनासाठीची तयारी सिद्धकेली आहे. तिची मुक्तता ही सह्याद्री परिसरात टिकाऊ व्याघ्र लोकसंख्या उभारण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. मुख्य वन्यजीव संरक्षक श्री. एम. एस. रेड्डी यांनी सांगितले की. व्याघ्रिणी एसटीआर -05 (तारा) हिची मुक्तता शास्त्रीय निकष, वर्तन मूल्यांकन व निश्चित प्रोटोकॉलनुसार करण्यात आली आहे. हा उपक्रम महाराष्ट्र वन विभागाच्या विज्ञानाधिष्ठित व दीर्घकालीन व्याघ्र संवर्धन दृष्टिकोनाचे प्रतिबिंव आहे. सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील नैसर्गिक कोअर ( जंगलात एसटीआर -05 (तारा) आणि एसटीआर -04 या दोन प्रौढ वाघिणी मुक्त करण्यात आल्या असून, यामुळे भविष्यात वाघांची वंशवृद्धी होण्यास चालना मिळणार आहे. त्याचबरोबर शाश्वत वन पर्यटन व रोजगारनिर्मितीलाही हातभार लागणार असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले.

