‘मोदी ९’ या अभियानांतर्गत ‘टिफीन पार्टी’

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १७ जुलै २०२३ | फलटण |
‘मोदी ९’ या अभियानांतर्गत आज फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष व धडाडीचे नगरसेवक अशोकराव जाधव यांनी ‘टिफिन पार्टी’चे अतिशय सुंदर नियोजन केले होते. यावेळी अ‍ॅड. नरसिंह निकम, फलटण कोरेगाव विधानसभा प्रमुख सचिन कांबळे-पाटील, शहराध्यक्ष अमोल सस्ते, माजी नगरसेवक बाळासाहेब भोसले, गटनेते अशोकराव जाधव, नगरसेवक सचिन अहिवळे, नगरसेवक बाळासाहेब कुंभार, ज्येष्ठ मार्गदर्शक मोहनराव रणवरे, युवा मोर्चाचे उपाध्यक्ष नितीन जगताप, कामगार आघाडीचे शहराध्यक्ष ओंकार गायकवाड, अशोकराव भोसले, राजेंद्र निंबाळकर, अमोल घाडगे, शरद सोनवणे, आनंद वणवे, बंडु नाळे, बाळासाहेब आडसूळ, रियाज इनामदार, महेश लवळे व प्रभागातील शक्ती केंद्रप्रमुख, बुथ अध्यक्ष व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रदेश कार्यकारणी सदस्य जयकुमार शिंदे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने संपूर्ण राज्यामध्ये एकाच दिवशी टिफिन पार्टीचे आयोजन केले आहे. ‘मोदी ९’ कार्यक्रमांतर्गत गेल्या महिन्यामध्ये विविध कार्यक्रम संपन्न झाले. वेगवेगळ्या स्तरातून जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न यामाध्यमातून करण्यात आला. यामध्ये दरमहा टिफिन पार्टी आयोजित करून कार्यकर्त्यांशी व जनतेशी संवाद साधता यावा म्हणून नियोजन करण्यात येत आहे. या टिफिन बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपल्या बूथमध्ये आपण काय काम करत आहोत, कशा पद्धतीने संवाद साधला पाहिजे, जनतेला अपेक्षित असणारी कामे आपले सरकार करतेय की नाही, याची माहिती घ्यावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामाची व राज्यातील सरकार व माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या कामांची संपूर्ण माहिती मतदारांशी व जनतेशी कशा पद्धतीने देता येईल. बुथ मध्ये किती लोकांशी संवाद झाला, किती लोकांची नव मतदार म्हणून नोंदणी केली, किती सरल अ‍ॅप डाऊनलोड केले, बुथमध्ये व्हाट्सअप ग्रुप तयार केले का, हर घर संपर्क अभियान राबवले का, याचीही चर्चा या टिफिन बैठकीमध्ये करण्यात यावी व अशाच पद्धतीने जनतेशी संवाद साधावा, असे आवाहन जयकुमार शिंदे यांनी केले.

यावेळी अ‍ॅड नरसिंह निकम यांनी बोलताना सांगितले की, आपल्या सर्वांचे लाडके खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे ज्या पद्धतीने काम करत आहेत त्याची संपूर्ण माहिती त्यांनी दिली. त्यामध्ये नीरा-देवघर रेल्वे, रस्ते, नाईकबोमवाडी एमआयडीसी, धोम-बलकवडी तसेच विविध कार्यक्रम, विविध जे प्रश्न सोडवले ते जनतेपर्यंत पोहोचवणे खूप गरजेचे आहे.

निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे हात बळकट करावेत, अशाही सूचना अ‍ॅड नरसिंह निकम यांनी दिल्या.

यावेळी कार्यक्रमाचे संयोजक अशोकराव जाधव यांनी बोलताना या कार्यक्रमाबद्दल संपूर्ण माहिती दिली व जनतेमध्ये जाऊन जास्तीत जास्त लोकांना यापुढेही अशा पद्धतीने काम करणार आहे व जनतेचे प्रश्न सोडवणार आहे, असे सांगितले.

या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाची नियोजन नीटनेटके करण्यात आले होते. यावेळी बुथ क्रमांक १५५,१५६,१७८ मधील बहुतांश नागरिक उपस्थित होते. प्रास्ताविक अमोल सस्ते यांनी केले व आभार नगरसेवक सचिन अहिवळे यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!