दैनिक स्थैर्य । दि. २७ जुलै २०२२ । सातारा । उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा मार्फत खाजगी नवीन वाहन नोंदणी व तत्सम कामकाज तसेच पक्की अनुज्ञप्ती व तत्सम कामकाज करण्यासाठी मोटार वाहन निरीक्षक यांचा सातारा जिल्ह्यातील तालुक्यांच्या ठिकाणी माहे ऑगस्ट 2022 मध्ये खाली नमुद केलेल्या दिनांकास दौरा आयोजित केला आहे.
फलटण दि. 4,11,18 व 25 ऑगस्ट 2022. वाई 3 व 17 ऑगस्ट, वडूज 5 व 19 ऑगस्ट, दहिवडी 12 व 26 ऑगस्ट, खंडाळा 10 व 24 ऑगस्ट, लोणंद 29 ऑगस्ट व कोरेगाव 8 ऑगस्ट 2022 रोजी.
तसेच कोविड-19 च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मा. जिल्हाधिकारी, सातारा यांच्या आदेशान्वये वरील दौऱ्याच्या कामकाजामध्ये बदल करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी कळविले आहे.