
भरधाव स्विफ्ट कारने तीन दुचाकींना उडवले,एकाचा मृत्यू 2 जखमी
स्थैर्य, नागठाणे, दि. २६ : पुणे -बेंगलोर आशियाई महामार्गावर वळसे (ता.सातारा) गावच्या हद्दीत भरधाव वेगाने जाणाऱ्या स्विफ्ट कारने पुढे चाललेल्या तीन दुचाकींना पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या भीषण अपघातात राजेंद्र हणमंत घाडगे रा.समर्थगाव (ता.सातारा)यांचा मृत्यू झाला तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले.शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास कराड ते सातारा जाणाऱ्या लेनवर हा थरारक अपघात झाला.
कारने ठोकरलेल्या दुचाकींपैकी एका दुचाकीवरील स्वार अक्षरशः चेंडूसारखा उडून महामार्गावरून सुमारे २५ ते ३० फूट खाली सेवारस्त्यावर डोक्यावर जाऊन पडला.तर अन्य दुचाकीवरील स्वारही जखमी झाले आहेत.अपघातानंतर सातारा कडे जाणाऱ्या कारचे तोंड पुन्हा कराड बाजूकडे झाले होते.एक दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला होता.अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळावरून पलायन केले.वळसे ग्रामस्थानी तातडीने जखमींना उपचारासाठी सातारा येथे पाठवले.अपघातामुळे महामार्गावरील वहातुक काही काळ खोळंबली होती.बोरगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली.