
दैनिक स्थैर्य । दि. ३० नोव्हेंबर २०२१ । सातारा । पुसेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ रविवारी दुपारी शॉट सर्किट मुळे आग लागल्याने कार जळून खाक झाली. आग लागल्या नंतर नागरीकांनी आग पाहण्यासाठी गर्दी केली. पण वेळेवर पोलीस येवून त्यानीं गर्दी हटवली. या घटनेत कोणतेही जीवित हानी झाली नाही.
निढळ ता खटाव येथील एका रुग्णाला त्रास जाणवू लागल्याने त्याच्या शेजाऱ्यांने त्या रुग्णाला पुसेगाव आरोग्य केंद्रात पाठवले.रुग्ण दवाखान्यात सोडल्याने गाडी वळताना बॅटरी जवळ शॉट सर्किट होऊन किट असलेल्या गाडीने पेट घेतला .सुमारे पंधरा मिनिटांच्या कालावधी मध्ये गाडी संपूर्ण जळून खाक झाली.दुपारी अचानक घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली.हवालदार सुनील अब्दागिरी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले.त्यानीं परस्थिती चे भान राखत गर्दी हटवून योग्य ती उपाययोजना केली.