वडगाव येथील जिल्हा बँकेवर दरोडा टाकणाऱ्या तीन युवकांना अटक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०९ ऑगस्ट २०२२ । पुसेसावळी | वडगाव येथील जिल्हा बँकेवर दरोडा टाकणाऱ्या तीन युवकांना अवघ्या १० तासात जेरबंद करण्यात औंध पोलिसांना यश आले आहे.

खटाव तालुक्यातील वडगांव जयराम स्वामी येथे दि. ०७ रोजी रात्री ०२.३० वा.च्या सुमारास काही अज्ञात चोरटयांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खिडकीचे लोखंडी गज, कापून बँकेचे आतमध्ये प्रवेश केला. तसेच गॅसकटरच्या सहाय्याने बँकेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. याबाबत माहिती प्राप्त होताच औंध पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्राप्त माहितीच्या आधारे गुप्त माहितीदार पेरून तपासाची चक्रे फिरवली. यानंतर घटनास्थळी काही पोलीस अंमलदार यांच्या उपस्थितीत बँक कर्मचारी यांनी सुरक्षीत ठेवलेल्या मुद्देमालाची खात्री केली. त्यांना रोख रक्कम व सोने-चांदीच्या दागिण्याचा एकुण १ कोटी ९५ लाख ९० हजार ४४१ रूपयाचा मुद्देमाल सुरक्षीत मिळून आला. त्यानंतर याबाबत औध पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १६५ / २०२२ भादवि कलम ४५७,३८०,५११, ४२७ दाखल करीत असताना औंध पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी दत्तात्रय.पी. दराडे यांनी पोलीसांच्या तिन वेगवेगळया टिम बनवून सीसीटीव्ही व मोबाईल सीडीआर यांच्या तांत्रिक माहितीवरून दोन संशयीत आरोपींना गुन्हयात वापरण्यात आलेली चार चाकी स्कॉरपीओ क्रमांक एम एच ०६ क्यू. ८८८८ ही गाडीसह सातारा येथून ताब्यात घेतले. तसेच एका आरोपीस वडगांव ज.स्वा. ता. खटाव येथून ताब्यात घेण्यात आले.
या गुन्हयातील तपासाच्या अनुषंगाने गोपनीय बातमीदाराचे मदतीने व सीसीटीव्ही फुटेज चेक करून व मोबाईल सीडीआर यांच्या तांत्रिक माहितीवरून गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेवून हर्षवर्धन हरिशचंद्र घार्गे वय २० वर्षे रा. शाहुनगर ता. जि. सातारा, यश संजय घार्गे वय १९ वर्षे रा. दौलत नगर ता. जि. सातारा आणि ऋषीकेश सोमनाथ नागमल वय २० वर्षे रा. वडगांव ज.स्वा.ता.खटाव जि.सातारा यांना १० तासाच्या आत जेरबंद करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बो-हाडे, सातारा यांच्या सुचनेप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक डी.पी. दराडे, पोलीस उप निरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे, सपोफौ जाधव, पोलीस नाईक राहुल सरतापे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल किरण हिरवे, पोलीस कॉन्स्टेबल महेश जाधव यांनी केलेली आहे.


Back to top button
Don`t copy text!