दैनिक स्थैर्य । दि. २८ नोव्हेंबर २०२२ । कराड । कराड शहर आणि परिसरात मारामारी खुनाचा प्रयत्न गंभीर घातपात आणि अपहरण यासारखे गंभीर गुन्हेगार करणाऱ्या टोळीपमुखअविनाश अशोक येडगे पृथ्वीराज बळवंत येडगे वय 24 देवेंद्र अशोक येडगे वय 22 यांना सातारा जिल्हा सांगली जिल्ह्यातील वाळवा कडेगाव शिराळा या तीन तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
टोळीप्रमुख अविनाश येडगे यांच्या गुन्हेगारी कारवाया संदर्भात कराड शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी बी आर पाटील यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 55 नुसार हद्दपार प्रस्ताव सादर केला होता त्याची सखोल चौकशी करून डॉक्टर रणजीत पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी कराड यांनी आपला अहवाल सादर केला सदर टोळीस हद्दपार प्राधिकरण यांच्या सूचनेनुसार पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी या टोळीला दोन वर्षासाठी हद्दपार केले आहे यामध्ये सातारा जिल्हा व सांगली जिल्ह्यातील वाळवा कडेगाव शिराळा या तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
या येडगे टोळीतील सदस्यांना सुधारण्याची संधी देण्यात आली होती मात्र त्यांच्या कारवान मध्ये काही फरक पडला नाही हद्दपारी कायद्याचा धाक असताना सुद्धा त्यांच्या बेकायदेशीर कारवाया सुरूच होत्या त्यामुळे सर्वसामान्य जनतेतून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत होती त्यानुसार पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी या टोळीवर कठोर कारवाई केली या कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस उपनिरीक्षक मधुकर गुरव, प्रमोद सावंत, केतन शिंदे ,अनुराधा सणस ,यांनी योग्य पुरावा सादर केला या कारवाईचे सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे.