दैनिक स्थैर्य | दि. १७ डिसेंबर २०२४ | फलटण |
फलटण येथील रिंगरोडवर साई मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलजवळ अज्ञात मोपेड दुचाकीचालकाने पाठीमागून धडक दिल्याने मोटारसायकल (क्र. एमएच-५३-००४३) वरील तिघेजण जखमी झाल्याची घटना दि. १२ डिसेंबर रोजी दुपारी १२.२० वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात अज्ञात मोपेड दुचाकीचालकावर गुन्हा दाखल असून अपघातानंतर मोपेड दुचाकीचालक घटनास्थळावरून पळून गेल्याचे हरी पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
या अपघातात फिर्यादी हरी शंकर पवार (वय ४०, रा. धुळदेव ता. फलटण, जि. सातारा), त्यांचा मित्र विजयकुमार अधिकराव सानवले व मुलगा विरजित हे जखमी झाले आहेत.
या अपघाताचा अधिक तपास महिला पोलीस हवालदार पूनम बोबडे करत आहेत.