जाधववाडी येथे लोखंडी गजाने तिघांना मारहाण


दैनिक स्थैर्य । 11 जुलै 2025 । फलटण । जाधववाडी, ता.फलटण येथील फलटण ते उपळवे जाणारे डांबरी रस्त्याच्या पुर्व बाजुला मंगळवारी रात्री 10.10 वाजण्याच्या सुमारास यश संतोष निंबाळकर (वय 17 वर्षे) रा. कुरवली खुर्द, ता. फलटण, जि. सातारा याला व त्याचा मित्र सुरज जाधव, विष्णु जाधव यांना अनिकेत घाडगे, साहील बुढा, साईनाथ रायते, प्रज्वल मोहीते, अश्विन देशमाने, समर्थ जाधव, सर्व रा.दत्तनगर, फलटण, ता.फलटण यांनी शिवीगाळ करुन लोखंडी गजाने व हाताने मारहाण केली.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, जाधववाडी, ता.फलटण येथील फलटण ते उपळवे जाणारे डांबरी रस्त्याच्या पुर्व बाजुला मंगळवारी रात्री 10.10 वाजण्याच्या सुमारास यश संतोष निंबाळकर व त्याचे मित्र सुरज जाधव, विष्णु जाधव यांना यांना अनिकेत घाडगे, साहील बुढा, साईनाथ रायते, प्रज्वल मोहीते, अश्विन देशमाने, समर्थ जाधव, सर्व रा.दत्तनगर, फलटण, ता.फलटण यांनी तीन मोटार सायकलवरुन येऊन यश निंबाळकर व त्याचे मित्र सुरज जाधव, विष्णु जाधव यांना जुन्या भांडणांचे कारणावरून शिवीगाळ दमदाटी केली. अनिकेत घाडगे याने दगडाने मारहाण केली.

साहिल बुढा याने उजव्या गालावर लोखंडी गजाने मारून जखमी केले. तसेच साईनाथ रायते, प्रज्वल मोहिते, अश्विन देशमाने, समर्थ जाधव यांनी हाताने बुक्यांनी मारहाण केली.

यश संतोष निंबाळकर याने फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली. अधिक तपास पोलीस हवालदार अमोल रणवरे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!