दैनिक स्थैर्य । दि. २८ जुलै २०२२ । सातारा । सातारा तालुक्यातून तीनजण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गजवडी, ता. सातारा गावच्या हद्दीत असणाऱ्या एका महाविद्यालय परिसरातून दि. २६ जुलै रोजी २.३० ते ४ परिसरात वास्तव्य करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची तक्रार तिच्या पालकांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
दुसऱ्या घटनेत दि.२५ जुलै रोजी २.३० वाजण्याच्या सुमारास वर्ये, ता. सातारा गावच्या हद्दीतून स्वाती जितेंद्र साळुंखे, वय २९, रा. जांब, ता. सातारा ही महिला आपल्या हॉटेल मालकिणीला मी पुलाखालुन मासे बघून येते, असे सांगून निघून गेली आहे. ती अद्याप परत न आल्याची तक्रार तिचे पती जितेंद्र मारुती साळुंखे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. तिसऱ्या घटनेत दि. २२ जुलै रोजी ११ वाजण्याच्या सुमारास कोडोली, ता. सातारा येथून तेथेच वास्तव्य करणारे सलीम हसन मुलाणी, वय ५३ हे घरातून निघून गेले आहेत. याबाबत पत्नी सायरा सलीम मुलाणी यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.