जबरी चोरी करून परजिल्हयात पळून चाललेले तीन अट्टल चोरटे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. २०: फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन जबरी चोऱ्या करून जिल्ह्याबाहेर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघा सराईत आरोपींना सातारा एलसीबी पथकाने जेरबंद केले. महेश जयराम जगदाळे वय २७ वर्षे, रा. कांबळेश्वर ता. बारामती, ऋतिक ऊर्फ बंटी देवानंद लोंढे, वय १९ , रा. कांबळेश्वर ता. बारामती, संकेत सुनिल जाधव , वय २४ , रा . कल्पनानगर , तांदूळवाडीरोड , बारामती अशी त्यांची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी, रोजी फलटण शहर पोलीस ठाणेस दोन जबरी चोरीचे गुन्हे घडले होते. या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपास करण्याच्या सुचना दिल्या. आरोपींनी गुन्हा करताना कोणताही प्रकारचा मोबाईल वापरलेला नसल्याने आरोपींचा शोध घेणे याचे पोलिसांसमोर आव्हान होते तथापि एलसीबीच्या पथकाने फक्त फिर्यादी यांनी दिले मौखिक वर्णनावरून बारामती तालुक्यातील एका रेकॉर्डवरील आरोपीचे नाव निष्पन्न केले. नंतर पथकाने बारामती तालुक्यात जावून आरोपीची माहिती घेतली. गुन्हयातील आरोपी हे सोमवार पेठ, फलटण येथे येणार असल्याची बातमी खास बातमीदारामार्फत स.पो.नि.आनंदसिंग साबळे यांना मिळाल्याने त्यांनी लागलीच सोमवार पेठ, फलटण येथे सापळा लावला . सायंकाळच्या वेळेस एका बजाज कंपनीच्या पल्सर मोटार सायकलवरून तीन इसम बारामती बाजूकडून फलटण बाजूकडे येताना येताना त्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवार पेठ येथे ताब्यात घेतले. त्यांचेकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी दोन्ही जबरी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांना पुढील कारवाईकरीता फलटण शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलेले आहेत. त्यांच्या ताब्यातून एक बजाज कंपनीची पल्सर मोटार सायकल क्र. एम.एच. १२. एम.एस. २४६ ही ताब्यात घेण्यात आलेली आहे. आरोपी हे गुन्हा करून परजिल्हयात पळून जाण्याच्या तयारीत असताना गुन्हा दाखल झालेपासून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या २४ तासात त्यांना जेरबंद केले. आरोपींना न्यायालयाने दिनांक २४/५/२०२१ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम करीत आहेत.

पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल व अप्पर पोलीस अधीक्षक, धीरज पाटील यांचे सुचनांप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, फलटण शहर पो. ठाणे पोलीस निरीक्षक श्री . भारत किंद्रे यांचे मार्गदर्शनखाली स.पो.नि. आनंदसिंग साबळे , रमेश गर्जे , नवनाथ गायकवाड , सचिन राऊळ , स.फौ. उत्तम दबडे , ज्योतीराम बर्गे , पो.हवा . विजय कांबळे , पो.ना. शरद बेबले , साबीर मुल्ला , रवींद्र वाघमारे , प्रविण कांबळे , वैभव सावंत , विजय सावंत यांनी सदर कारवाईत सहभाग घेतला .


Back to top button
Don`t copy text!