पाचगणीत वीज पडून तीन घोडी ठार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २१ ऑक्टोबर २०२२ । सातारा । विजांच्या कडकडाटासह सुरू असलेल्या मुसळधार पाऊस चालू झाला असता झाडाखाली स्टाॅलच्या समोर व आडोश्याला थांबलेल्या घोड्यांवर वीज पडून तीन घोडी जागीच ठार झाल्याची घटना आज गुरुवार (दि.२०) पाचगणी टेबल लॅंन्ड पठारावर दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.घोडे व्यावसायिक झाडापासून दूर असल्याने बचावले.

पाचगणी शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून आज दुपारी साडेतीनच्या सुमारास विजांच्या कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू झाला.जोरदार पडणाऱ्या पावसामुळे काही घोडे व्यावसायिकांनी आपली घोडी झाडालगत असणाऱ्या स्टाॅल समोर व आडोश्याला बांधून सदर व्यावसायिक दुसऱ्या स्टाॅलमध्ये थांबले.यावेळी जोरदार वीज यात वीज कोसळल्याने तीन घोडी जागीच ठार झाली.ऐन दिवाळी हंगामाच्या तोंडावर घोड्यांचा मृत्यू झाल्याने घोडे व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.

या घटनेत शंकर गायकवाड, संभाजी दामगुडे, सुनील कांबळे यांचे अंदाजे चार ते साडेचार लाखांचे नुकसान झाले आहे.


Back to top button
Don`t copy text!