
स्थैर्य, सोलापूर दि. 26 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी केंद्र सरकारने आरोग्य सेतू मोबाईल ऑप्लीकेशन लाँच केले आहे. आतापर्यंत सोलापूर शहर व जिल्ह्यातील तीन लाख 920 नागरिकांनी आरोग्य सेतू ॲप डाउनलोड केल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. हे ॲप मराठी, हिंदीसह एकूण अकरा भाषांमध्ये उपलब्ध आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावापासून दूर राहण्यासाठी माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी आणि सर्वांनी याबाबत सजग रहावे, यासाठी हे ॲप मार्गदर्शन करेल. आरोग्य सेतु ॲप ब्लूटूथ आणि जीपीएस सिस्टीमचा वापर करून कोरोनासंदर्भात मार्गदर्शन करते. जीपीआरद्वारे व्यक्तीचे रियल टाइम लोकेशन ट्रॅक करण्यात येते. कोणताही कोरोनाग्रस्त व्यक्ती जवळ आल्यास हे ॲप ट्रक करणार आहे. सहा फूट अंतरापर्यंत ॲप कोरोना बाधित व्यक्तीला ट्रॅक करू शकते.
कोरोना विरोधातील लढाईत लोकांना आरोग्य सेवेशी जोडणं या ॲपचा प्रमुख उद्देश आहे. आयओएस आणि अँड्रॉईड फोनवर हे ॲप डाऊनलोड करता येते.
कोरोनाला घाबरू नका, आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करा आणि कोरोनाशी संबंधित माहिती जाणून घ्या. आपल्या आजूबाजूला असलेल्या संक्रमित व्यक्तींची माहिती तसेच प्रत्येक राज्याचे हेल्प डेस्क नंबर आणि इतर महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आरोग्य सेतु ॲप महत्त्वाचे आहे, असे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी आवाहन केले आहे.
हे ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवर आणि ॲपल ॲप स्टोअर उपलब्ध आहे. अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही सिस्टिमवर उपलब्ध आहे. ॲप्लिकेशनच्या सहाय्याने आपण आपले कुटुंबिय, मित्र यांना विषाणूची बाधा होण्यापासून बचाव करता येणे शक्य आहे. या ॲप्लिकेशनमध्ये दिली जाणारी वैयक्तिक माहिती अतिशय सुरक्षित ठेवली जाणार आहे. याचबरोबर या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून पीएम केअर्स निधीमध्ये योगदान देता येते.