
स्थैर्य, बीड, दि. 15 : बीडजवळ मोटार सायकल आणि गाडीची टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातामध्ये मोटार सायकलवरील तिघे जण ठार झाले आहेत. तर गाडीने ही दोन पलटी मारली आहे. हा अपघात मांजरसुबा – लिंबागणेश रस्त्यावर मुलूकवाडी तीळ पुलावर घडला आहे.
बीड तालुक्यातील मांजरसुबा – लिंबागणेश रस्त्यावर मुळूकवाडी पुलावर मोटारसायकल अन फोर्ड गाडीमध्ये समोरासमोर अपघात झाला. मोटारसायकल वर तिघे जण प्रवास करत होते. अपघात होताच हे तिघे जण फेकले गेले. त्यात जागेवरच दोघे जण ठार झाले होते तर एका जखमीला तातडीने लिंबागणेश रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू होण्यापूर्वीच तिसरा जखमीही मृत घोषित करण्यात आला. यामध्ये मृत्यू पावलेल्यांची नावे संजय बाळु सोनावणे (35), बंकट बाबु मोरे (45, रा. मसेवाडी ता.बीड जि. बीड), गोरख बबन मोरे (32) अशी आहेत.