
स्थैर्य, फलटण, दि. १२ ऑगस्ट : सोनगाव (ता. फलटण) येथील तीन माजी सरपंच आणि एका विद्यमान सदस्याने माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. माजी जिल्हा परिषद सदस्या ॲड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर, अमरसिंह नाईक निंबाळकर आणि भाजप तालुकाध्यक्ष अमित रणवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला.
यावेळी माजी सरपंच रमेश जगताप, दिलीप भंडारी आणि हणमंत गोरे यांचे भाजप तालुकाध्यक्ष अमित रणवरे यांनी पक्षात स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या पक्षप्रवेशामुळे सोनगाव परिसरातील भाजपची ताकद वाढण्यास मदत होणार आहे.
याप्रसंगी अविनाश भोसले आणि त्यांचे सहकारी यांच्यासह भाजपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.