
दैनिक स्थैर्य । दि. २८ एप्रिल २०२२ । सातारा । बिअर शॉपी चे लायसन वरिष्ठ कार्यालयाला पाठवून ते प्रमाणित करून देण्याकरिता तीन लाख रुपयांची लाच घेताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तीन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे याप्रकरणी एक अधिकारी आणि दोन कर्मचारी यांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागातील गोरख कारनामे चव्हाट्यावर आले आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अशोक शिर्के यांनी दिलेल्या माहितीनुसार बिअर शॉपी चे लायसन प्रकरण वरिष्ठ कार्यालयास पाठवण्यासाठी लोकसेवक दत्तात्रय विठोबा माकर, नितीन नामदेव इंदलकर, सतीश विठ्ठलराव काळभोर यांनी बिअर शॉपी चे लायसन साठी वरचे कार्यालय मॅनेज करावे लागेल असे सांगून तीन लाख रुपयांची लाच मागितली होती या प्रकरणी संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा यांच्याकडे रितसर तक्रार दिली अशोक शेळके यांनी आपल्या टीमसह मंगळवारी दुपारी उत्पादन शुल्क कार्यालय परिसरात सापळा लावला लाच देण्यासाठी आलेले तक्रारदार व लाच घेणारे उत्पादन शुल्क विभागातील काळभोर माकर आणि इंदलकर यांना रंगेहात पकडण्यात आले.
सातारा जिल्ह्यामध्ये उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय सर्वात मोठी आहे या कार्यालयातून संपूर्ण सातारा जिल्ह्यातील बिअर शॉपी बियर बार तसेच देशी दारू दुकान यांना मोठ्या प्रमाणात अनधिकृतरीत्या काहीजणांना अभय देत परस्पर परवाने देण्याचे प्रकार सुरू झाल्याने आर्थिक लाभ घेण्याचे प्रकार बोकाळले आहेत सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधितांची कसून चौकशी केली जात आहे संबंधित अस्मान कडून आणखी काय काय या प्रकरणाचे धागेदोरे मिळतात का याचीसुद्धा तपासणी होत आहे.