
दैनिक स्थैर्य । 6 मे 2025। फलटण । सोनगाव (ता. फलटण) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका, यांच्यावतीने आयोजित त्रिदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनिल महाडिक यांच्या हस्ते झाले.
सुनिल महाडिक यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील संघर्षाची महत्त्वपूर्ण शिकवण दिली. आपले विचार ताकदवान बनवा, कष्टाला पर्याय नाही आणि यशाला शॉर्टकट नाही, असा मोलाचा संदेश त्यांनी दिला. त्याचबरोबर, सोनगावसारख्या छोट्याशा गावात अशी सुसज्ज अभ्यासिका पाहून त्यांनी विशेष कौतुक व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोविंद दूध डेअरीचे मॅनेजर सुजितकुमार भराडे होते. त्यांनी अभ्यासिकेच्या उपक्रमासाठी तीन हजार रुपयांची मदत दिली.
यावेळी पोलीस पाटील दीपक लोंढे, सोनगाव विकास सेवा सोसायटीचे चेअरमन संदीप पिंगळे, संतोष गोरवे, रामहरी पिंगळे, अतुल लोंढे, गणेश कांबळे, गणेश नामदास, रामचंद्र निकाळजे, विशाल निकाळजे, ज्ञानदेव शेंडे, शिवाजी ढवळे, कांतीलाल चव्हाण, महादेव चव्हाण, स्वप्निल वाघ, भगवान जगदाळे, मनोज मोरे, मयूर जाधव, नितीन शेंडगे, बळवंत बेलदार, सुरेश पवार, दादासो लोंढे, अमोल सस्ते, मनोज लोंढे, प्रमोद लोंढे व विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रा. राजेश निकाळजे यांनी सूत्रसंचालन केले. धनाजी मोरे प्रास्ताविक यांनी केले. पोपटराव बुरुंगले यांनी आभार मानले.
मंगळवार दि. 06 रोजी रांजणगावचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांचे मार्गदर्शन होणार आहे. बुधवार दि.07 रोजी फलटण ग्रामिण पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक मच्छिंद्र पाटील यांचे मार्गदर्शन होणार आहे.