वाळूच्या डंपरने तिन काॅलेजाच्या विद्यार्थांना उडवले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०९ ऑगस्ट २०२२ । म्हसवड । म्हसवड माणगंगा नदीपात्रातील अवैधरित्या विना परवाना चोरटी वाळू डंपरमध्ये भरुन पुळकोटीवरुन पानवण रोडने घेऊन जात असताना जांभुळणी (चौक) फाट्यावर पानवण येथील तीन काॅलेज कुमार आपल्या मोटारसायकलीवरुन देवापूर येथील काॅलेजला जात असताना म्हसवडवरुन वाळूने भरलेल्या डंपरने समोरुन येणाऱ्या मोटारसायकला समोरासमोरा धडक दिल्याने मोटार सायकल वरील तिघेही मोटारसायकलसह डंपर खाली गेल्याने एकजन गंभीर जखमी झाला तर इतर दोघे किरकोळ जखमी झाले असुन किरकोळ जखमीना म्हसवड येथील संचित हाॅस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले तर गंभीर जखमी समाधान नरळे यास अकलूज येथे उपचारासाठी दाखल केले तेथून पंढरपूर येथे अधिक उपचारासाठी दाखल केले आहे. अपघात स्थळावर पोलिस आल्यावर पंचनामा न करता डंपर नेहण्यावरुन नागरीक व पोलिस, याच्यात जोरदार शाब्दिक चकमक होऊन हि पोलिसांनी अपघात स्थळावरून डंपर पोलिस ठाण्यात नेत असताना पुळकोटीच्या वनीकरणात डंपर खाली करुन पोलिस ठाण्यात आणण्यात आल्या नंतर पानवणच्या नागरीकांनी तहसीलदार येवले व सपोनि ढेकळे यांना धारेवर धरत अपघात ग्रस्त डंपर मध्ये वनीकरणात टाकलेली वाळू भरुन पुन्हा ठाण्यात वाळू सह डंपर आणण्यात येवून डंपर चालक व मालक यांच्या वर गुन्हे दाखल करण्यात आले.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी आज सोमवार दिनांक ८ आॅगस्ट रोजी सकाळी साडे सातच्या दरम्यान पाणवन येथून विकास साधाप्पा नरळे वय १७,सुधिर शामराव शिंदे वय १६ तर सुभाष दादासो चव्हाण वय १८ हे तिघे हि देवापूर येथील रयत शिक्षण संस्थेत इयत्ता १२ सायन्स या शाखेत शिकत असल्याने नेहमी प्रमाणे ते तिघे हि पानवण येथून देवापूर कडे मोटारसायकल वरुन निघाले होते जांभुळणी फाट्यावर सकाळी आठच्या दरम्यान त्यांची मोटारसायकल आली असताना म्हसवडवरुन माणगंगा नदीपात्रातून चोरुन वाळू उपसा करुन पुळकोटी मार्गावरुन पानवण रोडने वाळू भरुन निघालेल्या डंपरने पानवण कडुन काॅलेजला मोटारसायकल वरुन निघालेल्या तिघांना जांभुळणी फाट्यावर जोरदार मोटारसायकल व डंपरची समोरा समोर जोरदार धडक झाली या धडकेत मोटारसायकल वरील तिघे हि गंभीर जखमी झाले काही वेळातच पानवण गावातील शेकडो नागरीक अपघात स्थळी आले म्हसवड पोलीस ठाण्याचे कर्मचारी हि घटनास्थळी आले जखमी तिन विद्यार्थी यांना उपचारासाठी हाॅस्पिटल मध्ये दाखल केले असता विकास नरळे याला जबर मार लागल्याने त्याला अधिक उपचारासाठी अकलूज येथे नेण्यात आले तर सुधीर शिंदे व सुभाष चव्हाण यांना संचित हाॅस्पिटल म्हसवड येथे उपचार सुरू केले दरम्यान या घटनेची माहिती माणचे तहसीलदार सुर्यकांत येवले यांना वाळूच्या डंपरने तिन विद्यार्थी उडवणची माहिती तिन तासानंतर समजल्यावर तहसीलदार येवले यांनी उपचार घेत असलेल्या दोन विद्यार्थी भेट घेऊन माही घेतली व ते पोलिस ठाण्यात गेले तेथे पानवणच्या नागरीकांनी अपघात स्थळी पोलिसांनी पंचनामा न करता वाळूने भरलेला डंपर इतर ठिकाणी खाली करुन पोलिस ठाण्यात मोकळा डंपर आणला असल्याची माहिती व मोबाईल वर काढलेले फोटो व व्हीडीओ दाखवले त्यानंतर तहसीलदार येवले व सपोनि ढेकळे यांनी वाळू खाली केलेल्या ठिकाणी डंपर नेहुन डंपर मध्ये वाळू भरु पुन्हा पोलिस ठाण्यात आणुन डंपर ड्रायव्हर हुबाले व डंपर मालक यांचेवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सांयकाळी पाच नंतर सुरू केली

माणगंगा नदीपात्रातील चोरटी वाळू बंद आहे म्हणून महसूल विभाग डांगोरा पिटत असला तरी महसूलच्या नाकावर टिंचून दिवस रात्र राऊतवाडी,जठरे वस्ती माने वस्तीवरील बंधारा, म्हसवड स्मशानभुमि परिसरात, शेंबडे वस्ती, पळशी आदी ठिकाणी दिवस रात्री विनापरवाना चोरुन वाळु उपसा सुरू आहे या वाळू उपशाला वाळू चोरट्यांनी नक्की अभय कोणाचे महसुल विभागाचे, म्हसवड पोलिसांचे कि राजकीय मंडळीचे नक्की वाळू चोरीला अभय कोणाचे देते अशी चर्चा सुरु आहे

म्हसवड पोलिसांनी अपघत स्थळावर डंपर व मोटारसायकल यांचा पंचनामा न करता घटनास्थळावरुन वाहणे हालवून डंपर मधील वाळूची व्हिलेवाट लावून मोकळा डंपर पोलिस ठाण्यात कोणाच्या सांगण्यावरुन आणला यामागील खरा चेहरा राजकीय कि महसूल कि पोलिसच नक्की कोण वाळू चोरट्यांना पाठबळ देत आहे

वाळू चोरी रोखण्यासाठी महसूलने तयार केलेले भरारी पथक कोणाच्या सांगण्यावरुन फरारी झाले दिवस रात्री वाळू चोरी होत असताना हे भरारी पथक काय करते भरारी पथक काम करत नसल्याने महसुलाचे वाळू उपसा रोकण्याच्या कामाचा ठेवा महसूल विभागाने म्हसवड पोलिसांना दिला आहे का?!..


Back to top button
Don`t copy text!