
दैनिक स्थैर्य । दि. ०१ मार्च २०२२ । सातारा । उसने दिलेल्या पैशात पॅन्ट-शर्ट का आणली नाही, या कारणावरून एका युवकाला घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रसाद येटणे रा. माची पेठ, आशू कदम व अमित (पूर्ण नाव माहित नाही, रा. चिमणपूरा पेठ) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत सुरूज नंदकिशोर यादव रा. व्यंकटपूरा पेठ यांनी फिर्याद दिली आहे.