
स्थैर्य, सातारा, दि. 17 : कृष्णानगर क्वाटर्स येथे एका घरातून 18 हजारांचे साहित्य जबरदस्तीने चोरून नेल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. अविनाश भिसे, अर्जून खंडागळे, संतोष चौरे रा. प्रतापसिंहनगर सातारा अश संशयीतांची नावे आहेत. कृष्णानगर क्वाटर्स येथील कडा वसाहतीत गुणवंत बाबुराव कांबळे यांच्या घरात तिघे संशयीत घुसले. त्यांनी घरातील मोबाईल व रोख साडेतीन हजार असा 18 हजार 500 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. याप्रकरणी तिघा संशयीतांवर गुन्हा दाखल झाला असून हवालदार दळवी तपास करत आहेत.