
दैनिक स्थैर्य । 17 जुलै 2025 । फलटण । वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या ओम बापूराव महानवर (रा. साखरवाडी, ता. फलटण) व श्रीय उर्फ मॉटी शरद खताळ यांना स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी (दि. 15) दुपारी अटक केली. हे दोघे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्याकडून मोबाइल हँडसेट, जिवंत काडतूस, देशी बनावटीचे पिस्तूल मोटारसायकल, असा एक लाख 80 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या दोघांच्या आणखी एका साथीदाराला पोलिसांनी अन्य ठिकाणावरून अटक केली आहे.
वाढे फाटा येथे दोन जण पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर गांगा मिळाली होती. देवकर यांनी पोलीस उपनिरीक्षक रिश्वास शिंगाडे, परितोष दातीर, सहाय्यक फौजदार आतिश घाडगे, संतोष सपकाळ, विजय कांबळे, संजय शिर्के यांचे पथक तेथे तैनात केले.
दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने, पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतले. संशयितांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस आढळून आले. संशयितांविरोधात भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3, 7 व 25 अन्वये सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या कारवाईत प्रवीण कांबळे, सनी आवटे, अमोल माने, अजित करणे, मुनीर मुल्ला, राजू कांबळे, अरुण पाटील, मनोज जायव, शिवाजी भिसे, राकेश खांडके, अमित होंडे, रवी वर्गे कार, वैभव सावंत, स्वप्निल दौंड, संकेत निकम यांनी भाग घेतला.