दैनिक स्थैर्य । दि. १९ फेब्रुवारी २०२३ । सातारा । खंडोबाचा माळ येथून ट्रक चोरी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी तिघाजणांना अटक केली आहे . ही कारवाई सांगली शहरांमध्ये 12 फेब्रुवारी रोजी करण्यात आली.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 30 जून 2022 रोजी सातारा शहर परिसरातील खंडोबाचा माळ येथून अशोक लेलँड कंपनीचा तीन लाख रुपये किमतीचा ट्रक चोरी झाल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती .सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्याकडे दिला निंबाळकर यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाच्या माध्यमातून या ट्रक चोरीची माहिती घेतली असता दोन चोरट्याने तो ट्रक सांगली येथील त्याच्या अन्य एका साथीदारासह बाहेर पाठवल्याची माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने सातारा पोलिसांचा सांगली कोल्हापूर या ठिकाणी तपास सुरू असताना सदरचा चोरटा हा सराईत गुन्हेगार असल्याने तो वेळोवेळी पोलिसांना गुंगारा देत कर्नाटक गोवा अशा ठिकाणी वास्तव्य करीत होता दिनांक 12 फेब्रुवारी रोजी सांगली शहरात संबंधित चोरटा आली असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल वाघमोडे यांना प्राप्त झाली तात्काळ सातारा पोलिसांचे पथक तिकडे रवाना झाले आणि संबंधित चोराला चोरी केलेल्या ट्रक सह ताब्यात घेण्यात आले ट्रक चोरी प्रकरणांमध्ये सातारा शहर परिसरातील दोघांचा समावेश असल्याचे माहिती प्राप्त झाल्यानंतर त्या दोघांनाही अटक करण्यात आली.
समाधान पांडुरंग हातेकर व 38 राहणार मंगळवार पेठ सातारा आसिफ राजू शेख व 39 राहणार सुतारवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली बशीर मजीत शेख वय 55 राहणार गुरुवार पेठ सातारा अशी संबंधित आरोपींची नावे आहेत या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे उपनिरीक्षक सुधीर मोरे पोलीस हवालदार वी आर दळवी अब्दुल खलिफा अंबादास के काटे संतोष कचरे यांनी भाग घेतला होता.