
स्थैर्य, सातारा, दि.२८: युवतीचा पाठलाग करून लग्न कर अन्यथा चेहर्यावर अॅसीड टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रम बाळकृष्ण निपाणे रा. महादरे या युवकावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी, विक्रम बाळकृष्ण निपाणे याने संबंधित युवतीचा सतत पाठलाग करून तिला ‘तु मला आवडतेस, मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे.’ असे म्हणून तिची इच्छा नसतानाही माझ्याशी लग्न कर अन्यथा तोंडावर अॅसीड टाकीन, बघतो तुझ्यासमवेत कोण लग्न करतोय अशी धमकी दिली. याप्रकरणी युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार विक्रम निपाणे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.