मेडिकल स्टोअरचा सीसीटीव्ही फोडून जिवे मारण्याची धमकी


दैनिक स्थैर्य । 23 मे 2025। फलटण । मलटण येथील सौर्यरंजन हॉस्पिटलमधील व्ही. पी. मेडिकल स्टोअरमध्ये असणारा सीसीटीव्ही कॅमेरा दगड मारुन फोडल्याप्रकरणी व शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी, सोमवार, दि. 19 रोजी रात्री 12.15 वाजण्याच्या सुमारास सनी माणिक जाधव (रा. मलटण, ता. फलटण) याने व्ही. पी. मेडिकल स्टोअरचा सीसीसीटी सीसीटीव्ही कॅमेरा दगड मारुन फोडला. त्यानंतर बुधवार, दि. 21 रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या मेडिकलमध्ये पुन्हा येऊन डॉ. विक्रम सुर्यकांत शिंदे (वय 35 वर्ष, रा. मलटण, ता. फलटण) यांना घाणेरडी शिवीगाळ करत दमदाटी केली. व तुझा कॅमेरा कसा संपवला, तसा तुला पण संपवणार आहे असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली.

याबाबतची फिर्याद डॉ. विक्रम सुर्यकांत शिंदे यांनी फलटण शहर पोलिसात दिली असून अधिक तपास पोलीस हवालदार राणी फाळके करत आहेत.

 

 


Back to top button
Don`t copy text!