सातार्‍यात युगनायकांचे विचार साहित्य संमेलन

अध्यक्षपदी डॉ. विलास खंडाईत, डॉ. शरद गायकवाड उद्घाटक


स्थैर्य, सातारा, दि. 19 सप्टेंबर : महाराष्ट्रविचार साहित्य संसद आणि विविध परिवर्तनवादी संस्था, संघटनांच्या संयुक्त विद्यामाने सातार्‍यात रविवारी (ता. 21) पहिले युगनायकांचे विचार साहित्य संमेलन आयोजित
करण्यात आले आहे.

या संमेलनाच्या अध्यक्षपदी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. विलास खंडाईत यांची निवड झाली असून, उद्घाटक म्हणून साहित्यिक डॉ. शरद गायकवाड यांना निमंत्रित केल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष अरुण जावळे यांनी दिली.
एकदिवसीय संमेलनाचे उद्घाटन सकाळी 10 वाजता होणार आहे. या वेळी सुशीलकुमार कांबळे, अरुण पोळ, नारायण जावलीकर, विलासराव कांबळेआदींची उपस्थिती असणार आहे. यानंतर पहिल्या सत्रात डॉ. अलोक जत्राटकर, डॉ. समता माने मार्गदर्शन करणार असून, अध्यक्षस्थानी डॉ. मृणालिनी आहेर राहणार आहेत. दुसर्‍या सत्रात डॉ. केशव पवार, डॉ. प्रदीप शिंदे सहभागी होणार असून, अध्यक्षस्थानी प्रा. अविनाश भाले असणार आहेत. तिसर्‍या सत्रात डॉ. एस. पी. कांबळे, अ‍ॅड. हौसेराव धुमाळ, अशोक भालेराव सहभागी होणार आहेत. दुपारी 4 वाजता संमेलनाध्यक्ष डॉ. विलास खंडाईत यांचे अध्यक्षीय भाषण होणार असून, या वेळी विनोद कुलकर्णी, सहाय्यक समाज कल्याण आयुक्त सुनील जाधव, प्रशांत पोतदार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील सांस्कृतिक भवनात सकाळी 10 वाजल्यापासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे संमेलन होणार असल्याची माहिती अरुण जावळे यांनी दिली आहे.


Back to top button
Don`t copy text!