राजगृहाची तोडफोड करणाऱ्यांना तात्काळ अटक करावी; फलटण तालुक्यातून मागणी


स्थैर्य, फलटण : ज्या राजगृहात डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे संविधान लिहलं. त्या राजगृहाची तोडफोड काही माथेफिरूंकडून करण्यात आलेली आहे. त्या बद्दल संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट तयार झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातले एकमेव महापुरुष आहेत कि, त्यांनी फक्त पुस्तकांसाठी घर बांधलेले आहे. ते घर म्हणजेच राजगृह. भारत देश ज्या संविधानाच्या अंमलबजावणीवर चालतो त्या संविधानाचा मसुदा डॉ. बाबासाहेबांनी याच राजगृहात बनविला होता. डाॅ. बाबासाहेबांच्या “राजगृहाची” तोडफोड करणार्‍या सडक्या बुध्दीच्या माथेफीरुंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व ह्या माथेफिरूंना तात्काळ अटक करण्यात यावी म्हणून फलटणचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांना फलटण तालुक्यातील सर्व नागरिकांच्या वतीने विजय येवले, हरिश काकडे, तेजस काकडे व कैलास रणदिवे यांनी सविस्तर निवेदन दिले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!