मनात कपटी भाव ठेवणाऱ्यांना आमचा निष्कपटपणा काय समजणार – खासदार उदयनराजे भोसले यांचा आमदार शिवेंद्रसिंहराजे यांना टोला

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.२९ मार्च २०२२ । सातारा । एखाद्याला माफ करण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो पण मनात कपट ठेवून वागणाऱ्यांना कधीच समजणार नाही . कुणाला सॉरी म्हणणे किंवा मोठ्या मनाने माफ करणे गैर नाही आमची लोकप्रियता खुपच असल्याने मुंह मे राम बगलमे छुरी असणाऱ्यांनी आमच्या लोकप्रियतेचा भलताच धसका घेतला आहे अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नाव न घेता केली

खासदार भोसले यांच्यावर शाहूपुरी येथील रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी टीका केली होती .या टीकेला जलमंदिर येथून प्रसिद्ध झालेल्या पत्रकातून खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रत्युत्तर दिले आहे . पत्रकात नमूद आहे की मनाचा निष्कपट पणा हा फार महत्त्वाचा असतो मनात कपट ठेवून बघणार्‍याला दुसऱ्याच्या मनाचा मोठेपणा समजणार नाही . आमची लोकप्रियता खुपत असल्यानेच त्यांनी आमचा धसका घेतला आहे . सातारा पालिका ही सातारकरांची आहे आणि सातारा विकास आघाडी ही नेहमीच विश्वस्त या भूमिकेत राहिली आहे .नगरपालिका म्हणजे सहकारी संस्था नाही सभासदांच्या सहकारी संस्था म्हणजे स्वतःची मालकी समजणाऱ्यांनी नगरपालिकेच्या मालकी विषयी भाषण करून स्वतःच्या बाल बुद्धीचा परिचय दिला आहे असा परखड टोला उदयनराजे यांनी लगावला आहे .

पत्रकात पुढे नमूद आहे की गेली चाळीस वर्षे यांचीच निरंकुश सत्ता होती . शाहूपुरी सारख्या भागात मूलभूत सुविधांची गरज असताना साधी ग्रामपंचायत स्थापन करता आली नाही . ते आता शाहूपुरी विकासाच्या वल्गना करत आहेत या ग्रामपंचायतीसाठी जिल्हा परिषदेचा ठराव आम्ही करून घेतला त्यामुळे या क्षेत्रातील नागरिकांना मुलभूत सुविधा मिळू लागल्या . विरोधासाठी विरोध आम्ही समजू शकतो पण विकासासाठी विरोध ही जर ते राजकीय कौशल्य समजत असतील तर त्यांचे कौशल्य त्यांनाच लखलाभ असो .शाहूपुरी डेपोचा दैनंदिन कचरा सोनगाव कचरा डेपोवर टाकण्यास यांनी हरकत घेतली होती . आम्ही त्याला नंतर मंजुरी दिली त्यांची ही प्रवृत्ती कोणी विसरले नाही . शाहूपुरी पाणी पुरवठा योजना यांच्यामुळे रखडली, नाही तर मागेच शाहूपुरीसह सोळा गावांना कण्हेरचे पाणी मिळाले असते .शाहूपुरी नळ पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन करणारांना जनाची नाही पण मनाची तरी लाज वाटायला हवी . माजगावकर माळावरील वस्ती हटविणे कामी यांनी कोर्टातून आदेश घेतले होते . यांनीच आपल्याला बेघर केले हे माजगावकर माळ वासियांना ठाऊक आहे आमच्या विचारांना स्वर्गीय दादासाहेब महाराज यांच्या विचारांचा वारसा आहे आम्ही सातारकर यांना आमच्या कुटुंबातील सदस्य समजत आलो आहोत कोणत्याही सातारकराला मिठी मारताना आम्ही हातचे काही राखून ठेवत नाही तुम्हाला आमच्या मिठी मारण्याच्या पद्धती ला स्वच्छ दृष्टीने पाहता येत नाही त्यामुळे तुम्ही आमच्या लोकप्रियतेचा धसका घेतला आहे . त्यामुळे जरा दृष्टी बदला आणि दृष्टिकोन बदलेल असा टोला उदयनराजे यांनी लगावला आहे.


Back to top button
Don`t copy text!