दैनिक स्थैर्य | दि. २४ ऑक्टोबर २०२१ | सातारा | सातारा जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राचे मी नाही … मी नाही करणाऱ्यांनी अतोनात नुकसान केले . शून्य आकारात स्टेडियम बांधले की व्यापारी संकुल , ज्यांनी हे पाप केले अशा तत्कालीन लोकप्रतिनिधिच्या व पालकमंत्री यांच्या कान फाटात लावली पाहिजे असे खळबळजनक वक्त वक्तव्य भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केले .
क्रीडा क्षेत्रातील सरकारी अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर येथील विश्रामगृहात उदयनराजे यांनी आपल्या संतप्त भावना तीव्र शब्दात व्यक्त केल्या .
उदयनराजे पुढे म्हणाले ज्यांनी सातारा जिल्हयाच्या क्रीडा क्षेत्राचे वाटोळे केले अशा तत्काली कांचे नाव घेण्याची सुद्धा माझी नाही . मी नाही मी नाही म्हणणाऱ्यांनी साताऱ्याच्या क्रीडा संकुलाचं वाटोळं केलं. मोक्याच्या जागा सातारकरांनी गमाविल्याने साताऱ्याच्या क्रीडा परंपरेला मोठा धक्का बसला आहे.
स्टेडियमचा धावमार्ग हा आयताकृती लागतो तर तो गोल स्वरूपाचा आहे. जोड्याने मारलं पाहिजे ज्या पालकमंत्र्यांनी आणि आमदारांनी मला विरोध केला आणि दाखवले की मी कारण नसताना विरोध करत आहे. हे कोणी केले आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांचे नाव घेतले तर माझ्या तोंडातून घाण वास मारेल म्हणून मी नाव पण घेत नाही. हे लोक जोड्यापुढे उभे करायच्या लायकीचे नाहीत. सगळीकडे घाण. साधे तुम्ही रणजी ट्रॉफीचे सामने घेऊ शकत नाहीत. यांनी सातारकरांना संपूर्ण झिरो करायचेच ठरवले आहे. त्याला आयताकृती मैदान लागते कुठून करायचे?” असा सवाल उदयनराजेंनी केला आहे.
उदयनराजे आपले म्हणणे सादर करताना म्हणाले “त्याकाळी रणजी ट्रॉफी शाहू स्टेडियमवर भरवल्या जात होत्या. मात्र आता भरवता येत नाहीत. ज्या बी जी शिर्के यांच्यासारख्या व्यक्तींनी बालेवाडी स्टेडियम बनवले अशा मोठ्या उद्योगपतीने या ठिकाणी टेंडर साठी अर्ज भरले होते त्यांना नाकारले. हे सर्व समोर येणे गरजेचे आहे. यामधून ही सर्व आमदार-खासदार माकडे आहेत त्यांनी बोध घ्यायला हवा. त्यावेळच्या साताऱ्याच्या पालकमंत्र्यांनी उत्तर द्यावे. प्रत्येक वेळेस मी नाही असं सांगितलं जातं यांना जोड्याने मारलं पाहिजे. स्टेडियमचे टेंडर काढले असताना स्टेडियमच्या बाहेरून गाळे कशे बनवले” असा संतप्त सवाल उदयनराजे यांनी केला .