स्थैर्य, पाटण, दि. 20 : लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यापर्यंत सुमारे 65 हजार नागरिक तर चौथ्या टप्प्याच्या सुरवातीला चार ते पाच हजार नागरिक पाटण तालुक्यात आले आहेत. करोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. बाहेरगांवाहून आलेल्यांनी प्रशासनाला सहकार्य करुन घरातच थांबावे, असे आवाहन ना. शंभूराज देसाई यांनी केले आहे.
पाटण तहसिल कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. प्रातांधिकारी श्रीरंग तांबे, सातारा सिंचन मंडळाचे अधिक्षक अभियंता संजय डोईफोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, कोयना धरणाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील, अभियंता सुरेन हिरे, शशिकांत गायकवाड, जलसंधारण अधिकारी अविनाश पदमाळे, डॉ. चंद्रकांत यादव, डॉ. आर. बी. पाटील, सपोनि तृप्ती सोनावणे, अभिषेक परदेशी, प्रशांत थोरात उपस्थित होते.
मागील दोन दिवसात मुंबई शहरातून आलेल्यामध्ये नाडोली येथे 23 वर्षीय महिला क्षयरोगाने तर बनपुरी येथे आलेली 45 वर्षीय महिलेच्या निधनाचे कारण समजू शकले नाही. अशा दोन महिलांचे निधन झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आपण सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. तालुक्यात बाहेरगांवाहून आलेल्या नागरिकांची संख्या अधिक आहे. या नागरिकांवर देखरेख ठेवावी अशा सूचना त्यांनी केल्या.