श्री शारदा पुरस्कार सौ. प्रतिभा मनोहर जोशी यांना वितरित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 23 डिसेंबर 2024 | फलटण | अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था फलटणच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा श्री शारदा पुरस्कार नुकताच पुणे येथील शिक्षण तज्ञ व व्यवस्थापन तज्ञ डॉक्टर सौ. प्रतिभा मनोहर जोशी यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचा वर्धापन दिन व शारदा पुरस्कार वितरण समारंभ नवलबाई मंगल कार्यालय, फलटण येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.म्रुणालिनी आवटे तर प्रमुख पाहुणे सौ.शिल्पा इनामदार व फलटण केंद्राचे प्रमुख विजय ताथवडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना सौ प्रतिभा जोशी यांनी सांगितले की मी पुणे येथे नेसवाडिया वाणिज्य महाविद्यालय व महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था येथे अध्यापन व संचालक तसेच संस्थापक म्हणून कार्य केले आहे. आमच्या पूर्वीच्या काही खऱ्या अर्थाने विद्यादानाचे कार्य होत होते. सामाजिक परिणामाने सर्वांच्या गरजा वाढल्या आहेत परंतु अवश्य गरजा कमी केल्या तर सुंदर आयुष्य घडवता येते असे सांगितले. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन अध्यापन करावे असे करणे गरजेचे आहे असे सांगितले.

यावेळी सौ प्रतिभा जोशी यांना श्री शारदा पुरस्कार रोख रक्कम 5000 स्मृतीचिन्ह व शेला, श्रीफळ असा सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात सौ. आवटे यांनी सांगितले की आजच्या शारदा पुरस्कार म्हणजे आदिशक्तीचा गौरव असून समाजातील आदर्श स्त्री यांनी केलेल्या कार्याची पावती आहे. भारतात राष्ट्रपती पदावर श्रीमती द्रौपदी मुर्मू तर राज्यात सौ.सुजाता सौनिक, रश्मी शुक्ला, अश्विनी भिडे इत्यादी स्त्रिया या नारीशक्तीचा गौरव आहैत असे सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व शारदा व भगवान परशुराम प्रतिभा यांचे पूजन करण्यात आले. केंद्रप्रमुख विजय ताथवडकर यांनी सर्वांचे स्वागत करून यावर्षी संस्थेचा पंचवीस वर्षे पूर्ण होत असून वर्षभर भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. प्रमुख मान्यवरांच्या परिचय डाँ.माधुरी दाणी, सौ. मंगल चरेगावकर व सौ.प्रभुणे यांनी करून दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निखिल केसकर यांनी केले तर आभार चंद्रशेखर दाणी यांनी मानले. या कार्यक्रमास डॉक्टर प्रसाद जोशी, मनोहर जोशी, श्रीमती जयश्री जोशी, प्राध्यापक विक्रम आपटे यांचे सह निरा व लोणंद केंद्राचे पदाधिकारी व फलटण येथील निमंत्रित, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!