यंदाचा औंध संगीत महोत्सव 22नोव्हेंबर रोजी आँनलाईन सादर होणार; दिग्गज गायकांचे होणार शास्त्रीय गायन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

सावनी शेंडे, विश्वनाथ जोशी, यज्ञेश रायकर, विश्वेस सरदेसाई

स्थैर्य, औंध, दि.२०: दरवर्षी अश्विन वद्य पंचमीला शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान, डोंबिवली या संस्थेतर्फे आयोजित केला जाणारा औंध संगीत महोत्सव या वर्षी ऑनलाइन पद्धतीने २२ नोव्हेंबर , २०२० रोजी साजरा केला जाणार आहे.

यंदा या महोत्सवाचे ८० वे वर्ष आहे

ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. अनंतबुवा जोशी यांनी त्यांचे अध्यात्मिक गुरू शिवानंद स्वामी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ औंध (तालुका खटाव , जिल्हा सातारा) येथे १९४० पासून प्रस्तुत उत्सव सुरू केला. सुरुवातीला छोटेखानी स्वरूप असलेल्या या उत्सवाचे स्वरूप हळूहळू वाढत गेले. आणि पं. अंतुबुवा यांचे सुपुत्र प्रख्यात गायक व व्हायोलिन वादक पं. गजाननबुवा जोशी यांनी १९८१ साली ‘शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान’ या संस्थेची स्थापना केली. तेव्हापासून हा महोत्सव शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान या संस्थेमार्फत आयोजित केला जातो.

भारतरत्न पं. भीमसेन जोशी, पं. जितेंद्र अभिषेकी, गिरीजादेवी, उ. सुलतान खा अशा अनेक दिग्गज आणि बुजुर्ग कलाकारांनी या महोत्सवात हजेरी लावली आहे. अशी थोर परंपरा लाभलेल्या या महोत्सवात आजही अनेक ज्येष्ठ-श्रेष्ठ कलाकार आपली कला दरवर्षी सादर करीत असतात. तसेच नवोदित उगवते कलाकार देखील औंध महोत्सवात आपली कला सादर करत असतात.

८० वर्षांची परंपरा लाभलेला हा महोत्सव इतकी वर्षे संपूर्णपणे निशुल्क पद्धतीने साजरा करण्यात येतो आणि या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण भागामध्ये आयोजित केला जाणारा हा एकमेव उत्सव असावा. अनेक रसिक श्रोते तसेच अनेक शास्त्रीय संगीताचे विद्यार्थी देखील दरवर्षी न चुकता आवर्जून या संगीतपर्वणीचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी औंध येथे येतात.

थकीत बिलासाठी बांधकाम कंत्राटदारांचे गृहराज्यमंत्र्यांना साकडे

आपण सर्व जाणताच की यंदा करोना महामारीच्या अभूतपूर्व अशा संकटाने पूर्ण जगाला ग्रासले आहे. साहजिकच येणाऱ्या मर्यादा व आरोग्यासाठी असणारे धोके लक्षात घेता यंदा संस्थेने हा उत्सव ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या उत्सवातील सर्व कलाकारांची सादरीकरणे ही ‘औंध संगीत महोत्सव’च्या facebook page वरून तसेच शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानच्या फेसबुक पेजवरून व you tube channel वरून प्रसारित करण्यात येतील.

२२ नोव्हेंबर,२०२० रोजी सकाळी १० वाजता पहिले सत्र सुरू होईल. या सत्राची सुरुवात युवा कलाकार श्री.यज्ञेश रायकर यांच्या व्हायोलिन वादनाने होईल. त्यांना तबला साथ करतील श्री.विश्वनाथ शिरोडकर. या नंतर श्री.विश्वनाथ जोशी यांचे एकल तबला वादन सादर होईल, त्यांना लेहरा साथ करतील श्री.सिद्धेश बिचोलकर. प्रथम सत्राची सांगता श्री.विश्वेश सरदेशपांडे यांच्या गायनाने होईल. त्यांना संवादिनी साथ करतील श्री. सौमित्र क्षीरसागर तर तबला साथ असेल श्री.पुष्कर महाजन यांची.

द्वितीय सत्राची सुरुवात संध्याकाळी ६ वाजता सुप्रसिद्ध गायिका श्रीमती सावनी शेंडे यांच्या गायनाने होईल. त्यांना संवादिनी साथ श्री.सुयोग कुंडलकर करतील तर तबला साथ असेल श्री.चारुदत्त फडके यांची. यंदाच्या औंध संगीत महोत्सवाची सांगता श्री.हेमंत पेंडसे यांच्या गायनाने होईल. त्यांना देखील संवादिनी साथ श्री.सुयोग कुंडलकर करतील तर तबला साथ करतील श्री. प्रणव गुरव.

तरी जास्तीत जास्त श्रोत्यांनी ‘औंध संगीत महोत्सव’च्या facebook page वरून तसेच शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानच्या facebook page व you tube channel वरून या संगीत पर्वणीचा आनंद घ्यावा असे आवाहन शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत आहे.

गेली १५हून अधिक वर्ष औंध संगीत महोत्सवाला ललित कला केंद्र (गुरुकुल)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ह्या शिक्षण संस्थेकडून मिळत आलेल्या सहयोगमुळे या उत्सवाला मोलाची मदत मिळत आहे अशी शिवानंद प्रतिष्ठानच्या अपूर्वा गोखले व पल्लवी जोशी यांनी दिली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!