यंदा भारतात टी-20 विश्वचषकाचा रोमांच, आपण सलग दुसऱ्यांदा करणार आयोजन, 100 कोटी लोक पाहणार विश्वचषक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, दि.१: क्रीडाप्रेमींना २०२१ मध्ये दोन मोठ्या स्पर्धांची प्रतीक्षा असेल. पहिली खेळाचा कुंभमेळा टोकियो ऑलिम्पिक आणि दुसरी क्रिकेटच्या सर्वात छोट्या प्रकारातील टी-२० ची विश्वचषक स्पर्धा. रोमांचक विश्वचषक टी-२० स्पर्धेचे आयोजन पुन्हा एकदा भारतात होत आहे. म्हणजे १४ वर्षांनी पुन्हा चॅम्पियन बनण्याची संधी आहे. २००७ मध्ये द. आफ्रिका यजमान असलेल्या प्रथम स्पर्धेत आपण जगज्जेता बनलो होतो. भारत सलग दुसऱ्यांदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-२० विश्वचषकाचे आयोजन करेल. २०१६ मध्ये टीम इंडियाने उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. तेव्हा देशातील ७ प्रमुख शहरांत झालेली स्पर्धा जवळपास ७३ कोटी चाहत्यांनी पाहिली. ११०० कोटी रुपये उत्पन्न मिळवले होते. यंदा दोन्ही बाजूंत वाढ होण्याची शक्यता आहे. जगभरातील प्रेक्षकांचा आकडा १०० कोटींपर्यंत पोहोचू शकतो, कारण प्रत्येक वर्षी जगभरातील प्रेक्षकांत वाढ होत आहे. कमाईदेखील १६८ टक्के वाढून १८५० कोटी रुपये होऊ शकते. त्याचबरोबर २०१६ च्या विजेत्या विंडीजला १२ कोटी रुपये मिळाले होते. यंदा विजेत्याला १८ कोटी मिळू शकतात.

टी-२० मध्ये खेळतात १०४ देश
कसोटी क्रिकेट सर्वात जुना प्रकार आहे. १८७७ पासून आतापर्यंत २३९९ कसोटी झाल्या. मात्र, अातापर्यंत केवळ १२ देशांना कसोटी खेळण्याची मान्यता दिली. दुसरीकडे, पहिला टी-२० सामना २००४ मध्ये झाला व आजपावतो १०४ देशांना टी-२० खेळण्याची मान्यता मिळाली आहे. ७४ देशांनी कमीत कमी एक टी-२० सामना खेळला आहे.

कमाल } मोठा २५७ धावांचा विजय झेकच्या नावे
क्रमवारीत ६० व्या स्थानावरील झेक गणराज्यच्या नावे सर्वात मोठ्या २५७ धावांच्या विजयाचा विक्रम आहे. २०१९ मध्ये तुर्कीला हरवले. युरोपचे सर्वाधिक ३४ संघ टी-२० क्रिकेट खेळतात.

यजमान }अंतिम सामना सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये
१६ संघांत ४५ सामने अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, दिल्ली, मोहाली, धर्मशाळा, कोलकाता, मुंबईत होणार. जगातील सर्वात मोठ्या मोटेरा स्टेडियममध्ये अंतिम सामना होण्याची शक्यता आहे.

२०२३ वनडे विश्वचषकाची तयारी; पंड्या असेल एक्स फॅक्टर

तज्ज्ञ म्हणतात , चंद्रेश नारायणन
टी-२० विश्वचषक कोरोनाकाळानंतर देशातील सर्वात मोठी स्पर्धा असेल. भारतीय कर्णधार विराट कोहली व प्रशिक्षक रवी शास्त्री पहिली आयसीसी स्पर्धा जिंकू इच्छितात. मोठ्या फटक्याच्या शैलीमुळे चाहत्यांना हार्दिक पंड्याकडून अपेक्षा असतील. स्पर्धेदरम्यान तो गोलंदाजी करू लागला तर आपल्यासाठी एक्स फॅक्टर ठरेल. ही देशातील २०२३ आयसीसी विश्वचषकाच्या तयारीचा भाग असेल. इंग्लंड आवडता संघ म्हणून उतरेल. कारण त्यांच्याकडे स्फोटक फलंदाज बेन स्टोक्ससारखा अष्टपैलू आहे. न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया दावेदार आहेत. २०२० टी-२० विश्वचषकासाठी पात्र संघ २०२१ मध्ये थेेट खेळतील. यात श्रीलंका, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, हॉलंड, ओमान, नामिबिया, पापुआ न्यू गिनी संघ पहिल्या फेरीत भिडतील.


Back to top button
Don`t copy text!