यावर्षी फिनटेकमध्ये या महत्वपूर्ण बाबींवर राहील लक्ष

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. 18 फेब्रुवारी 2022 । मुंबई । फिनटेकमुळे आपल्या पेमेंट पाहण्याच्या आणि वापरण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाले आहेत. फिनटेक म्हणजे वित्तीय सेवांच्या प्रदानासाठी तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण वापर होय. भारतात या उद्योगाचे मूल्य ५०-६० दशलक्षच्या आसपास असून २०२५ पर्यंत हा उद्योग १५० दशलक्ष डॉलरपर्यंत ($150 billion mark) पोहोचण्याची अपेक्षा आहे.

तथापि ही फक्त गोष्टीची सुरूवात आहे कारण फिनटेकला आणखी विकसित होण्यासाठी प्रचंड संधी आहेत. व्यवहार, प्रदान, बचती, गुंतवणुका आणि विमा यांच्यासंदर्भात त्यांनी अत्यंत मोठ्या प्रमाणावर सुलभता आणली आहे. फिनटेक क्षेत्रात २०२२ मध्ये पाहता येतील अशा काही महत्वपूर्ण गोष्टींबद्दल सांगताहेत एंजेल वनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नारायण गंगाधर.

फक्त डिजिटल बँका: अनेक विकसनशील देशांसाठी बँकिंग अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचवणे अत्यंत कठीण ठरले आहे. स्मार्टफोन आणि डिजिटल व्यवहारांमुळे बँकिंग आता बँकेच्या शाखेत जाऊन करण्याची गरज उरलेली नाही. विनाखिडकी बँकिंगला आता लोकप्रियता मिळू लागली आहे. केवायसीसारख्या कागदोपत्री प्रक्रिया आणि खाते उघडणे, व्यवहार, रोख हस्तांतरण व वीजबिल प्रदान यांच्यासारखी कार्ये आता व्हिडिओद्वारे डिजिटल माध्यमातून करता येतील.

ग्लोबल फायनान्समध्ये ब्लॉकचेन: जागतिक पातळीवर वित्तीय व्यवहारांचा चेहरा आमूलाग्र बदलण्यासाठी ब्लॉकचेन आपला वेग, जागतिक पोहोच आणि कमी प्रक्रिया शुल्क यांच्यामुळे आता सुरू आहे. ब्लॉकचेन हे वितरित लेजर तंत्रज्ञान असून त्याचा जास्तीत-जास्त वापर वित्तीय सेवा कंपन्यांकडून केला जातो. वित्तीय सेवा कंपन्या ब्लॉकचेनवर आधारित व्यवहारांचा वापर करून आता परदेशातील व्यवहार आणि मनी ट्रान्सफरचा खर्च कमी करू शकतात. रेकॉर्डसोबत छेडछाड होणार नाही याचीही काळजी ब्लॉकचेनमुळे घेतली जाते. त्यामुळे वित्तीय पूर्तता, सिक्युरिटी ट्रेडिंग आणि तत्सम गोष्टींसाठी ते फायदेशीर ठरते. त्यामुळे डिजिटल चलनांवर आधारित व्यवहाराची रचनाही तयार केली जाते. त्यामुळे व्यवहाराचा खर्च कमी करणे, रोख रकमेची हाताळणी आणि इतर खर्च कमी करून अत्यंत सुरक्षित प्रदानाची पद्धत दिली जाते.

डेटावर आधारित सूक्ष्म कर्ज: आज डेटावर आधारित सूक्ष्मवित्ताला केंद्रस्थान प्राप्त झाले आहे. फिनटेक व्यवसाय आता ग्राहकांची वागणूक आणि खर्चाच्या पद्धती अ‍ॅपद्वारे तपासू शकतात. त्यांना या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी बँकेचा ताळेबंद किंवा क्रेडिट स्कोअरची गरजही भासणार नाही आणि त्यातील अनेकांना कर्जाच्या संकल्पनेचीही कल्पना नाही. या ठिकाणी स्मार्टफोन इंटरफेस, ग्राहकांचे अनुभव आणि डेटा विश्लेषण यांचा वापर करून फिनटेक उद्योगांना यशस्वीरित्या कर्जलेखन करून देशातील सर्वांत दुर्गम भागांमध्ये सूक्ष्म कर्जाचा पुरवठा डिजिटल पद्धतीने करणे शक्य होईल.

कृत्रिम बुद्धिमत्ता: बँक्स आता आणखी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या एआय उपाययोजनांना सुसज्ज करत आहेत. त्यामुळे वित्तीय सेवांमध्ये एआयच्या वापराला वेग येईल. तथापि, या दृष्टीकोनातून पाहणे सोपे नाही. जगातील इतर व्यवसायांप्रमाणे बँकांना एआय तज्ञांचा तुटवडा जाणवतो आहे. मनुष्यबळ क्षेत्रातील सध्याच्या प्रवाहांमधून हे दिसते की, एआय तज्ञ हे जगभरातील कामगरांच्या तुलनेत अत्यंत नगण्य आहेत. एआय सामान्यतः सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण, आर्थिक घोटाळ्यांशी संबंधित समस्या यांच्यावर वापरले जाते, कारण त्यांच्याकडे असंरचनात्मक माहितीवर काम करण्याची क्षमता आहे. सर्वोच्च ग्राहक सेवा सॉफ्टवेअरमध्ये चॅटबोट आणि इतर स्मार्ट यंत्रणांद्वारे एआयचा आधीपासूनच वापर केला जातो. वित्तीय सेवा याला अपवाद नाहीत आणि ग्राहकांना वेगवान व्यवहार व सुलभता देतात.

वित्तीय समावेशासाठी आणि पेमेंट अधिक सहजसाध्य करण्यासाठी सीबीडीसीला लोकप्रियता प्राप्त: डिजिटल प्रदान पद्धती आणि पायाभूत सुविधा अधिक मजबूत होत असताना जगभरातील मध्यवर्ती बँका मध्यवर्ती बँक डिजिटल करन्सी आणण्यासाठी अत्यंत उत्सुक आहेत. सीबीडीसीमुळे बँकांना डिजिटल पेमेंट सुधारण्यासाठी आणि शेवटच्या टप्प्यातील प्रदान अधिक सुलभ करण्यासाठी फायदा मिळेल. मध्यवर्ती बँकांना त्यामुळे चलने तयार करणे, प्रत्यक्ष पैशाची देखभाल आणि खोट्या नोटांवर लक्ष ठेवून त्यांचा शोध लावणे अशा इतर अनेक गोष्टींसाठी त्यातून मदत मिळू शकते.

डिजिटल करन्सीचा फायदा म्हणजे त्या कायमच उपलब्ध असतात. म्हणजे जेव्हा ग्राहकाला आवश्यक असतील तेव्हा. त्यातून रोख व्यवहाराची हाताळणी करणाऱ्या मध्यस्थांमध्येही घट होईल आणि रेमिटन्सचा खर्च कमी करताना मनी ट्रान्सफर आणि रेमिटन्सशी संबंधित गुन्हेगारी कृत्येही कमी होतील.

सारांश: आपण आतापर्यंत पाहिलेल्या फिनटेक बाबी या फक्त प्रारंभ आहेत. विनासंपर्क पेमेंट्स, स्वस्त ब्रोकिंग, किमान शुल्कावर आधारित मालमत्ता व्यवस्थापन दृष्टीकोन आणि अत्यंत वेगवान विमा उत्पादन डिलिव्हरी या सर्व गोष्टींमध्येही त्यांचा वापर होणार आहे. हे बदल मोठे आहेत, परंतु आगामी वर्षांमध्ये त्यापेक्षाही बरेच जास्त आपल्याला पाहायला मिळणार आहेत.


Back to top button
Don`t copy text!