यंदा ऑक्टोंबरमध्येही कास धरणाच्या सांडव्यावरुन पाणी


कास – कास धरणाच्या सांडव्यावरुन पाणी वाहतानाचे मनमोहक चित्र. (छायाचित्र – अतुल देशपांडे, सातारा)

स्थैर्य, सातारा, दि. 10 ऑक्टोबर : सातारा शहराला पाणीपुरवठा करत असलेले कास धरण यंदाच्या वर्षी गुरुवार, दि. 19 जूनला पूर्ण क्षमतेने भरले होते. अधूनमधून पडणार्‍या पावसाने धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या क्षमतेने वाहणारे पाणी गेल्या साडेतीन महिन्यांपासून म्हणजेच सलग 110 दिवस वाहतानाचे मनमोहक चित्र पाहावयास मिळत आहे.

कास परिसरातील अधूनमधून पावसाची संततधार व गेल्या पावणेचार महिन्यापासून सलग ओव्हरफ्लो झाले. कास धरणामुळे देशातील एक नंबरचा भांबवली येथील वजराई धबधबादेखील मोठ्या प्रमाणावर कोसळतानाचे चित्र होते. यावर्षी जून महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावत पडलेल्या मुसळधार पावसातच धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली होती. दरम्यान, कास धरण 19 जूनला ओव्हरफ्लो झाले.

यावर्षी जूनमध्ये मान्सूनपूर्व पावसाने कास परिसरात चांगली हजेरी लावली होती. यामुळे सलग दहा-बारा दिवसांच्या जोरदार पावसामुळे कास धरण 19 जूनला पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले होते. 19 जूनपासून आजवर देखील सलग साडेतीन महिन्यांपासून कास धरणाच्या सांडव्यावरून कमी-जास्त प्रमाणात पाणी वाहतच आहे. सततच्या रिमझिम पावसाने सड्यावरून कोसळणारे पाणी यामुळे कास धरणात पाणीसाठा होऊन सद्यः स्थितीला सांडव्यावरून कमी-जास्त प्रमाणात पाणी सतत वाहत आहे. तसेच धुकेदेखील मोठ्या प्रमाणावर पडत आहे.


Back to top button
Don`t copy text!