दैनिक स्थैर्य । दि. २९ ऑकटोबर २०२२ । फलटण । अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, फलटण व उष:काल प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने महाराजा मंगल कार्यालय येथे दिवाळी पहाट ‘रंग भक्तीचा हा संगितमय कार्यक्रम नुकताच दिमाखात पार पडला.
सद्गुरु ब्रह्मानंद प्रस्तुतच्या गायकांनी अभंगवाणी, भक्तीगीते व भावगीतांनी सुरेल पहाट उजळून निघाली. या कार्यक्रमात केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर, अबिर गुलाल उधळीत रंग, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, उष:काल होताहोता काळरात्र झाली, ऐसी लागी लगन या सारख्या गीतांना प्रेक्षकांनी प्रतिसाद मिळाला.
ही गीते रमेश वाडेकर, देवानंद पाटील, सोमनाथ सुतार, मानसी पाटील कैलास सावंत जयवंत नाना या कलाकारांनी गायकीची सेवा उत्तम सादर केली.
प्रारंभी उष:काल प्रतिष्ठानचे श्रीपदा विभुते यांनी सर्वांचे स्वागत करुन सद्गुरु ब्रह्मानंद च्या गायकांचे बुके देऊन स्वागत केले तर ब्राह्मण संघाचे अध्यक्ष विजय ताथवडकर यांनी उष:काल प्रतिष्ठानने हा कार्यक्रम सादर करुन दिवाळी पहाट उजळून काढली असे सांगून ब्राह्मण संघाच्या कार्यक्रमाची माहिती दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. प्रसाद जोशी, प्रसन्न जोशी, ब्रह्मानंद पराडकर, श्रीपाद विभुते व कलाकारांनी दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रमास संघटनेचे पदाधिकारी, सभासद व निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते.