तीस वर्षापुर्वी केले होते लोणंदमध्ये श्री राम रथ यात्रेचे स्वागत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्थैर्य, लोणंद, दि. ०४ : प्रभू श्री राम मंदिराचे आज भुमिपूजन होत आहे. अयोध्देमध्ये राममंदिर व्हावे यासाठी गावागावात रथयात्रा काढण्यात आल्या होत्या सन 1990 साली म्हणजे सुमारे तीस वर्षापुर्वी काढण्यात आलेल्या रथ यात्रेचे लोणंद ग्रामपंचायत समोर स्वागत करण्यात आले होते. राममंदिराचे भुमिपूजन होत असताना आपण केलेल्या प्रयत्नांना यश मिळाल्याचा आनंद होत असतानाच या निमित्ताने आज जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.

संपूर्ण देशात बहुप्रतीक्षीत असलेल्या राम मंदिराचे उदया भुमिपूजन होत आहे पण  राममंदिर होण्यासाठी केलेला संघर्ष या निमित्ताने पुढे येत आहे. हा संघर्ष देशपातळीपासुन गाव पातळीवर केला गेला  होता. त्या काळी अगदी बोटावर मोजण्याइतके भाजपाचे कार्यकर्ते होते पण तरीही सर्वांना बरोबर घेऊन संघर्ष सुरू होता.

भाजपाचे जेष्ठ नेते सुभाषराव क्षीरसागर यांच्या संग्रहातील असाच एक फोटो पाहण्यास मिळाला. अयोध्देमधील श्री राम मंदिराच्या शिला पुजना पुर्वी सन 1990 च्या सुमारास रथ यात्रा निघाली होती या रथ यात्रेचे  लोणंद ग्रामपंचायत समोर डॉ. मुरलीधर वामन पंडित, नारायणराव दाजीराम साळुंखे ,सुभाषराव विष्णुपंत क्षीरसागर, डॉ. राजन मुरलीधर पंडित, सुरेश वामनराव चव्हाण, लक्ष्मणराव सोपानराव जाधव, प्रमोद गेणू डोईफोडे, कै.कमलाकर बुरुंगले, चंद्रकांत बुरुंगले आदींनी स्वागत केले होते. या  निमित्ताने या आठवणींना उजाळा मिळाला आहे.

त्यावेळी खंडाळा तालुक्यातील सर्व गावातुन राम मंदिराच्या उभारणी साठी प्रत्येक गावातुन एक वीट गावातील सर्व ग्रामस्थांनी पालखी मध्ये ठेऊन गावातुन मिरवणुक काढुन मंदिराच्या उभारणीसाठी दिली आहे. त्या सर्व विटा अयोद्धे मध्ये पोहोच करण्यात आल्या होत्या.

लोणंद मध्ये त्याकाळी भारतीय जनता पार्टी ,राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे काम श्रीकृष्ण पतसंस्थेचे संस्थापक – चेअरमन  डॉ. मु.वा.पंडित ( बाबा ) , कै.विनायक पुरकर , कै. वसंतराव फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली कै. मनोहर पंडित, नारायणराव साळुंखे, सुभाषराव क्षीरसागर , मिठूभाई पटेल,आण्णा पुरकर , चंदूभाई पटेल,सुधीर कुलकर्णी ,डॉ. राजन पंडित, सुरेश चव्हाण,प्रमोद जगताप , अनिल क्षीरसागर आदी कार्यकर्ते जातीय सलोखा राखत कोणताही तेढ निर्माण न होता काम करीत होते.

राममंदिराचे भुमिपूजन होत असताना आपणही या संघर्ष यात्रेचे साक्षीदार असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!