दिव्यांग सामाजिक संस्थेच्या शिबिरात तीस जणांचे रक्तदान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०५ डिसेंबर २०२१ । सातारा । येथील दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेने जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर भरवले होते. या शिबिरामध्ये 30 रक्तदात्यांनी रक्तदान ‘केले. यावेळी विविध मान्यवरांनी भेटून संस्थेच्या कार्याचे कौतुक केले आहे.

आम्हाला सहानुभूती नको, तर आमचे मुलभूत हक्क द्या, या ध्येयाने प्रेरित असलेले दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय पवार हे जागतिक अपंग दिनी दरवर्षी समाजहितैषी उपक्रम राबवित असतात. दिव्यांगांच्या मुलभूत अधिकारांसाठी प्रशासनाबरोबर नियमित संपर्कही ठेवत असतात. यावर्षी अजय पवार यांनी रक्तदान शिबिराबरोबरच आत्मदहन करण्याचा इशाराही प्रशासनाला दिला होता. त्यांच्या या भूमिकेमुळे भानावर येत प्रशासनाने त्यांच्या मागण्यांकडे सकारात्मकतेने पाहण्याबाबत त्यांना लेखी हमी दिली. त्यामुळे आत्मदहन त्यांना रद्द करावे लागले. पवार यांच्या रक्तदान शिबिरास मात्र रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरात 30 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदात्यांना हेल्मेटचेही वाटप करण्यात आले.
जागतिक अपंग दिनी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरास सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अनिल ढेब तसेच विविध मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट देवून अजय पवार यांच्या कार्याचे कौतुक करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. जिल्हा पोलीस दलातील राहुल खाडे यांनीही शिबिरास भेट देत रक्तदान केले.

या शिबिरास अनिल बेडेकर, शैलेश बोर्डे, अमोल निकम, आनंदा पोतेकर, प्रणित भिसे, अजय कांबळे, अक्षय बाबर, राजेंद्र देशमुख, स्वरुप घाडगे, विनोद केळेकर, संदीप प्रकाशे, प्रविण चांदणे, रवी गाडे, अमोल कारंडे, विद्या कारंडे, विजय मोरे, शंकर साळवी, ऋषिकेश पाटोळे, गिता पार्टे, समिना शेख, गौरव जाधव, प्रविण साबळे, हरिभाऊ साळुंखे, दुर्योधन बाबर, श्रीरंग पवार, मोहन लाड, दिलखुश गायकवाड, राजेंद्र चव्हाण, नितीन शिंदे, प्रशांत बगले, नंदु साठे, दीपक खडक, नम्रता देवकर, प्रमोद बोराटे, प्रवीण भुजबळ, राजेंद्र यादव, शरद इंगवले, सागर भोकरे, अक्षय जगताप, बाळासाहेब शिंदे, श्रावण पैलवान, भाग्यश्री काळभोर, अनिता कडव, मंदा गाडे आणि अक्षय ब्लड बँकेचे अक्षय साळुंखे आणि त्यांच्या स्टाफने उपस्थिती लावून सहकार्य केले.


Back to top button
Don`t copy text!