
स्थैर्य, सातारा, दि. 17 डिसेंबर : पाचगणी येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पाचगणी पोलिसांनी आणि सातारा स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत मुंबईवरून आलेल्या स्कोडा आणि एमजी हेक्टर या आलिशान वाहनांमधून आलेल्या 10 पर्यटक संशयितांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत कोकन कॅप्सूलसह अंदाजे 13 ग्रॅम, 43 लाख रुपयांचा ड्रग्स मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एमजी हेक्टर आणि स्कोडा गाडीतून सदर व्यक्ती हे पर्यटक घेऊन आले असल्याची माहिती सांगण्यात येत आहे मात्र दहा जणांना सध्या ताब्यात घेण्यात आली आह. अवघ्या दोन दिवसांपूर्वीच जावळी तालुक्यातील सावळी येथे 115 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले होते.
त्या मोठ्या कारवाईनंतर लगेचच आता पाचगणीमध्ये ड्रग्सचा सप्लाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पाचगणी पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार पाचगणी पोलीस ठाणे आणि सातारा एलसीबीने तात्काळ हालचाली वाढवत सापळा रचला.

