दैनिक स्थैर्य । दि. १६ नोव्हेम्बर २०२२ । सातारा । जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा शाबीत झाल्याने 13 जणांना पाचशे रुपये दंड एक आठवडा साधी कैद येईल आणि दंड न दिल्यास एका आठवड्याची कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे दुसरे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस आर सालकुटे यांनी हे आदेश दिले.
या खटल्याचे अधिक माहिती अशी फलटण मौजे मंजवडी येथे प्रतीक पान सेंटर येथे गंगाराम लंगोटे यांच्या गाड्याच्या शेजारी दिनांक 25 जून 2016 रोजी सायंकाळी पावणे सात वाजता आरोपी गणेश विष्णुपंत वाघमोडे सागर भाऊसो ठणके नारायण रामदास ठणके नानासो रामदास ठाणगे बिभीषण बाळासो आटोळे अमोल विजय ठणके अंकुश संभाजी ठणके प्रमोद संपत ठणके ज्ञानदेव सर्जेराव ठाणगे गजानन किसन ठणके राजेंद्र बापूराव ठणके दौलत प्रभाकर पुंडुकले व धनंजय बाळासाहेब ठणके यांनी फिर्यादीची नातेवाईक शुभांगी रणदिवे वैभव उर्फ अंकुल किसन ठणके यांचे पाईपलाईन वर पिण्याचे पाणी व कपडे धुण्यास गेले असता वैभव याने तू पाणी भरण्यासाठी यायचे नाही या कारणावरून आरोपी शिवीगाळ दमदाटी केली आणि जातीवाचक शब्द वापरले या घटनेबाबत विचारणा केली असता आरोपी यांनी आपापसात संगणमताने गर्दी जमा करून फिर्यादी आणि तिथे असलेल्या इतर लोकांना जातीवाचक शिविगाळ केली.
हातात तलवार दांडकी काठ्या कुऱ्हाड हत्यारांनी दगडफेक करून साक्षीदारांना जखमी केले शशिकांत मोहन मोरे यांच्या उजव्या पायाच्या नडगीवर महादेव ठणके याने कुऱ्हाडीचा तुंबा मारला या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपाधीक्षक रमेश चोपडे यांनी केला होता दुसरे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस आर सालकुटे यांच्यासमोर हा खटला चालवण्यात आला या केस मध्ये एकूण 12 साक्षीदार तपासण्यात आले परिस्थितीजन्य पुरावा आणि साक्षीदारांचे साक्षीवरून आणि सरकारी वकील यांचा युक्त ग्राह्य धरून न्यायाधीशांनी पंधरा आरोपींना पाचशे रुपये दंड दंड न दिल्यास एक आठवडा साधी कैद व भारतीय दंड विधान 323 149 नुसार पाचशे रुपये दंड आणि दंड न दिल्यास साधी कैद आणि भारतीय दंड विधान 325 नुसार एक महिना साधी आणि पाचशे रुपये दंड दंड राहिल्यास एक आठवड्याची शिक्षा सुनावली.
पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी म्हणून पोलिस अंमलदार मुस्ताक शेख यांनी कामकाज पाहिले प्रोसिफिकेशन स्कॉड चे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव शमशुद्दीन शेख गजानन फरांदे मंजूर मनेर राहीना अभिषेक राजेंद्र कुंभार आश्विनी घोरपडे व अमित भारती यांनी परिश्रम घेतले.