दैनिक स्थैर्य । दि. २२ नोव्हेंबर २०२२ । सातारा । उंब्रज तालुका कराड येथे एक महिन्यापूर्वी बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने कौशल्यपूर्ण तपासानंतर अटक केली आहे गितेश दत्तात्रय नावडकर वय 26 राहणार पडळी तालुका जिल्हा सातारा राम उर्फ दयामन्ना कोळी व 21 राहणार राधिका चौक सातारा मूळ राहणार तळी कोटी कन्नूर विजापूर या दोघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी दिनांक 19 नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना उंब्रज येथील एटीएम फोडाफोडी प्रकरणातील आरोपी मोटार सायकल सह नागठाणे येथील स्मशानभूमी जवळ थांबल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती . सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर आणि त्यांच्या पथकाने देवकर यांच्या आदेशाप्रमाणे संबंधित परिसरात जाऊन आरोपीचा शोध घेतला तेव्हा दोन्ही आरोपी यामाहा मोटरसायकलवर आढळून आले त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी सुमारे एक महिन्यापूर्वी उंब्रज शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र चे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला असल्याची गुन्ह्याची कबुली दिली.
त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दीड लाख रुपये किमतीची मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे या कारवाईमध्ये उत्तम दबडे, तानाजी माने ,अजित करणे,प्रवीण कांबळे, प्रवीण पवार, मुनीर मुल्ला यांनी सहभाग घेतला होता या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अभिनंदन केले आहे.