पथदिवे नसल्याने चोरट्यांनी डाव साधला; लोणंदमध्ये घरफोडी, साडेअकरा लाखांचा ऐवज चोरीस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ६ जुलै २०२१ । लोणंद । लोणंद येथील बाजारतळ परिसरारतील एका एका घरातून सुमारे साडेअकरा लाखांचा माल चोरट्यांनी लंपास केला आहे. याबाबत लोणंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झालेली आहे. दरम्यान, लोणंद चोरट्यांनी इतर ठिकाणीही घरफोड्या केल्या आहेत. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

कुसूम अशोक शेलार यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार लोणंद बाजारतळ येथील त्यांच्या रहात्या घरातून रात्री कटावनीच्या सहाय्याने दरवाजा उघडून अज्ञात चोरट्याने घरातील लोखंडी कपाट आणि लाकडी कपाटातील सुमारे सत्तावीस तोळे सोन्याचे दागिने व अकरा हजार रोख असा तब्बल साडेअकरा लाखांचा ऐवज लंपास केला.

लोणंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल के.वायकर यांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने सातारा येथील श्‍वानपथकास पाचारण करून शोध घेण्याचा प्रयत्न केला. सातारा श्‍वान पथकातील ’वीर ’ या श्‍वानाने घटनास्थळापासून काही अंतरावर माग काढण्याचा प्रयत्न केला. लोणंद पोलीसांनी याप्रकरणी एका संशयीतास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

शहरातील पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी गडद अंधाराचा फायदा घेत चोरटे अनेकांच्या घरावर डल्ला मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रकार घडत आहेत. शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असूनदेखील अंधारामुळे ते कुचकामी ठरलेत. लोणंद शहरात सध्या पथदिवे बंद असल्यामुळे नागरीकांनी आपल्या घराबाहेरील दिवे रात्रीच्या वेळेस सुरू ठेवावेत, तसेच आपल्या घराच्या दारे खिडक्या व्यवस्थित बंद करावेत, असे आवाहन लोणंद पोलिसांकडून करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!