बोअरवेल व्यावसायिकाची १ लाख ४७ हजारांची बॅग चोरट्यांनी लांबविली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २७ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
लक्ष्मीनगर, फलटण येथील आय.डी.बी.आय. बँकेत भरणा करण्यासाठी गेलेले बोअरवेल व्यावसायिक विनित विठ्ठल शिंदे (वय ३२, रा. शिंदेवाडी, पो. खुंटे, ता. फलटण) यांची १,४७,००० रुपयांची लाल रंगाची कॅरीबॅग मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना दि. २५ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

विनित शिंदे हे आपल्या मशीन कामगारासोबत बँकेत पैसे भरणा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्याजवळ सुमारे १,६०,००० रुपये होते. त्यापैकी १३ हजार रुपये ते बँकेत भरत असताना त्यांनी आपल्या कामगाराजवळ राहिलेले १,४७,००० रुपये असलेली कॅरीबॅग व मोबाईल हॅण्डसेट देऊन त्यास बँकेबाहेर बसण्यास सांगितले होते. ते बँकेत भरणा करीत असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्या कामगाराजवळ असलेली १,४७,००० रुपयांची बॅग हिसकावून पोबारा केला. या चोरीत एकूण १,४७,००० रुपये व ५ हजार रुपयांचा मोबाईल हॅण्डसेट असा सुमारे १,५२,००० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.

या चोरीची नोंद फलटण शहर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!