
दैनिक स्थैर्य | दि. १९ मार्च २०२३ | फलटण |
मुरूम (ता. फलटण) व परिसरातील गावांमधील डी.पी. चोरट्यांनी फोडून ट्रान्स्फॉर्मरमधील ४०० लिटर ऑईल व १६० किलो वजनाची कॉपर वायर चोरून सुमारे १ लाख ४० हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याबाबतची फिर्याद राहुल अंगदराव महालिंगे (रा. साखरवाडी) यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.
या चोरीची पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, दि. १४ मार्च रोजी रात्री मुरूम व परिसरातील गावांतील डी.पी. अज्ञात चोरट्यांनी खाली पाडून फोडल्या. या डी.पीं.वरील ट्रान्स्फॉर्मरमधील ४०० लिटर ऑईल सुमारे २० हजार रुपये किंमतीचे जमिनीवर खाली सांडून त्यातील १६० किलो वजनाची सुमारे १ लाख २० हजार रुपये किंमतीची कॉपर वायर चोरट्यांनी लंपास केली आहे. या चोरीची फिर्याद राहुल अंगदराव महालिंगे (रा. साखरवाडी, तालुका फलटण) यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात शनिवारी दिली.
या प्रकरणी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून ए. एल. काशिद अधिक तपास करत आहेत.