ते चोरी झालेले लोखंडी प्रवेशद्वार सापडले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. ०५ : जेव्हा अस्मितेचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा त्याच्या मुळापर्यंत जाऊन उत्तर शोधणारे मावळे आजही साताऱ्यात आहेत. शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरात सुशोभीकरण सूरु आहे.ठेकेदाराचे आळमटळम काम सातारकर नागरिकांच्या दृष्टीतून सुटत नाही. दोन दिवसांपूर्वी याच कामतले चाळीस वर्षापूर्वीचे लोखंडी प्रवेशद्वार चोरीला गेले होते. पत्रकारांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यावर लक्ष वेधले. धर्मवीर युवा मंच आणि शिवसेनेच्या मावळ्यांना झोप लागली नाही. बुधवारी सकाळी उठून त्या प्रवेशद्वाराचा शोध साडे बारा वाजेपर्यंत घेतला तेव्हा ते सापडले. या दरम्यान, या घटनेशी संबंधित एका नगरसेवकाची फोनाफोनी सुरू होती. बांधकाम विभागाच्या अभियंत्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.

राजधानी सातारच्या शिवतीर्थ येथे ग्रेड सेपरेटरच्या कामात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसराचे सुशोभीकरण सुरू झाले आहे. हे काम बांधकाम विभागाकडून एक ठेकेदार करतो आहे. या ठेकेदाराकडून आळमटळम काम होत आहे. त्याचाच प्रत्यय सातारकरांच्या नजरेतून सुटला नाही. नूतनीकरण करताना जुने साहित्य, प्रवेशद्वार हे अचानकपणे दोन दिवसांपूर्वी तेथून गायब झाले. पत्रकारांना याची माहिती मिळताच रात्री त्यावर प्रकाशझोत टाकला असता बांधकाम विभागाच्या प्रशासनाची तारांबळ उडाली. मात्र, अस्मितेला हात घातल्याने तत्वाशी तडजोड न करणाऱ्या सातारच्या धर्मवीर युवा मंचचे प्रशांत नलावडे आणि शिवसेनेचे उपतालुका प्रमुख रमेश बोराटे यांना झोप लागली नाही. सकाळी उठल्यावर प्रशांत नलावडे यांनी ते चोरी गेलेले प्रवेशद्वार शोधण्यासाठी पहिले बांधकाम विभागाचे अभियंता यांचे केबिन गाठून त्यांना गाठण्यासाठी गेले. मात्र, त्यांची भेट झाली नाही. फोनवरून त्यांच्यावर प्रश्नाची सरबत्ती केली. तेव्हा त्यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारीत तो प्रश्न येतो असे सांगून टोलवाटोलवी करण्याचा प्रयत्न केला. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने जिल्हा परिषद अध्यक्ष बंगला येथे ते प्रवेशद्वार ठेवल्याचे सांगितले. तेथे नलावडे हे गेले असता तेथे गेट नसल्याचे निदर्शनास येताच पुन्हा त्यांनी बांधकाम विभागाच्या अभियंत्यास विचारणा केली तेव्हा सभापती निवास येथे ते गेट असावे असे सांगितले. सभापती निवास परिसरात ते गेट आढळून आले. या दरम्यान, त्या एका नगरसेवकाचे गेट प्रकरणावरून फोनाफोनी सुरू होती.

धर्मवीर युवा मंच आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे बांधकाम विभागात वातावरण तणावापूर्ण निर्माण झाले होते.

अभियंत्यांचीच चुकी होत असलेल्या कामाच्या ठिकाणी जे साहित्य आहे ते अनमोल आहे. ते जुने असलेले साहित्य जर येथून चोरीला जात असेल तर शोकांतिका आहे. यामध्ये अभियंत्यांचे दुर्लक्ष असल्याने आम्ही त्यांना जाब विचारणार होतो परंतु ते आम्हाला भेटले नाहीत. त्यांनी लक्ष ठेवले नाही ही त्यांची चुकी आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया धर्मवीर युवा मंचचे प्रशांत नलावडे यांनी व्यक्त केली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!