स्थैर्य, मुंबई, दि.२७: जग सध्या अभूतपूर्व अशा करोना महामारीचा सामना करीत आहे. केंद्र आणि राज्य सरकारांप्रमाणेच विविध संस्था यावर उपाययोजना करत आहेत. भारत सरकारच्या मते भारत केवळ ११४ दिवसांत कोव्हिड-१९ लसीचे १७ कोटींपेक्षा जास्त लसीचे डोस देणारा वेगवान देश बनला आहे. काही आघाडीच्या कॉर्पोरेट ब्रँड्सनी ही यासाठी पुढाकार घेतला असून कर्मचा-यांच्या लसीकरणाचा संपूर्ण भार उचलला आहे.
एमजी मोटर: एमजी मोटर इंडियाने मागील आठवड्यात आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी कोव्हिड-१९ लसीकरण मोहीम सुरु केली होती. एमजीच्या सर्व थेट आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी ही मोहीम वाढवण्यात येत आहे. गुरुग्राम आणि हलोल येथील कर्मचाऱ्यांकरिता मोफत लसीकरण मोहीम राबवण्यासाठी वाहननिर्मात्याने संबंधित विभागाशी भागीदारी केली आहे. कॉर्पोरेशनकडून दिली जाणारी लस ही ऐच्छिक आहे. आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना रोगप्रतिबंधक लस घेण्यासाठी ही कंपनी प्रोत्साहन देत आहे.
पेटीएम: भारतातील आघाडीचा डिजिटल फायनान्स सर्व्हिस प्लॅटफॉर्म पेटीएमने ८००० पेक्षा जास्त फील्ड सर्व्हिस एक्झिक्युटिव्हसाठी (एफएसई) लसीकरण मोहिमेची सुरुवात झाली. हे कर्मचारी त्यांच्या व्यवसाय विकास आणि व्यापारी समर्थन नेटवर्कचा अविभाज्य भाग आहेत. कंपनीने देशभरातील अग्रगण्य रुग्णालयांच्या सहकार्याने याआधीच १००० पेक्षा जास्त एफएसईंसाठी लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण केला आहे. देशातील लसीचा एकूण पुरवठा वाढताच एफएसईंच्या कुटुंब सदस्यांसाठीही लसीकरण मोहीम राबवण्यात येईल.
झूमकार: झूमकारने कर्मचाऱ्यांच्या कोव्हिड लसीकरण मोहिमेसाठी वैद्यकीय भागीदारांशी करार केला आहे. उपलब्धता आणि पोहोचानुसार, झूमकारच्या कर्मचाऱ्यांना तसेच त्यांच्याशी संबंधित राज्य/शहरातील सहकाऱ्यांना लसीसाठी मदत प्रदान केली जाईल. लसीकरण केंद्र, शहर, राज्य, क्षेत्र पिनकोड आणि इतर संपर्काचे तपशील थेट वैद्यकीय भागीदारांकडून संबंधीत व्यक्तीकडे पाठवले जातील. दोन्ही बाजूंसाठीचा लसीकरणाचा खर्च झूमकारकडून केला जाईल. कर्मचाऱ्याने पूर्वीच लस घेतली असता झूमकारतर्फे तो खर्च परत दिला जाईल. लसीकरणानंतर एखाद्याला दुष्परिणाम जाणवल्यास, विद्यमान रजा धोरणानुसार संबंधित व्यक्ती रजा घेऊ शकते.