साथीच्या दुसऱ्या लाटेत भारताला ‘श्वास’ घेण्याकरिता ‘या’ ब्रँड्सनी केली मदत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि.३१: साथीच्या लाटेविरुद्ध लढण्याकरिता सर्वच ब्रँड शक्य तेवढे योगदान देत आहेत. त्यात एमजी मोटर इंडिया, पेटीएम, झोमॅटो, डेल्हीवरी यांसारख्या आघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. ऑक्सिजनचा पुरवठा सुनिश्चित होण्याकरिता ते त्यांच्या परीने प्रयत्न करत आहेत.

एमजी मोटरने औद्योगिक ऑक्सिजन आरोग्यसेवा विभागाकडे वळवला:

समाजसेवा छत्र एमजी सेवा अंतर्गत एमजी मोटर इंडियाने, आपला प्रकल्प बंद करून औद्योगिक ऑक्सिजन वाचवण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून तो आरोग्यसेवा विभागाकडे वळवता येईल. कारनिर्माता कंपनीने गुजरातमधील देवानंदन गॅसेस प्रा. लि. कंपनीसोबतही नुकताच करार केला. या भागीदारीनंतर आठवडाभराच्या आतच, संबंधित कंपनीच्या वडोदऱ्यातील प्रकल्पातून ताशी १५ टक्के ऑक्सिजन निर्मिती वाढवण्यात आली. ही वृद्धी लवकरच ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा एमजीचा उद्देश आहे.

एमजीने नुकतीच घोषणा केली की ती, जीएमईआरएस हॉस्पिटलमधील रुग्णांच्या कुटुंबीयांना जेवण पुरवणार आहे. सध्या एमजीच्या हेक्टर अॅम्ब्युलन्स देशसेवा करणाऱ्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सेवा पुरवत आहेत. कारनिर्माता कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या कोव्हिड प्रभावित कुटुंब सदस्यांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सची आयात करत आहे.

पेटीएमची ‘ऑक्सिजन फॉर इंडिया’ उपक्रमाद्वारे निधी उभारणी:

भारतातील सर्वोच्च डिजिटल पेमेंट्स प्लॅटफॉर्म पेटीएमने त्याच्या ‘ऑक्सिजन फॉर इंडिया’ या उपक्रमाअंतर्गत १४ कोटी रुपयांचा निधी जमवला असून याद्वारे देशभरात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स वितरीत केले जातील. या उपक्रमाअंतर्गत मिळालेला सर्व निधी पेटीएमने वापरला. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स सरकारी रुग्णालयांना दान करण्यात आले. त्यांनी अमेरिकन इंडिया फाउंडेशन आणि इलेव्हेशन कॅपिटल सोबत त्यांनी यूझरचे योगदान मिळवण्यासाठी भागीदारी केली.

झोमॅटोची ‘इंडिया नीड्स ऑक्सिजन’ उपक्रमाद्वारे निधी उभारणी: 

प्रसिद्ध फूड डिलिव्हरी आणि रेस्टॉरंट अग्रीगेटर अॅप झोमॅटोने फीडिंग इंडिया अंतर्गत ‘इंडिया नीड्स ऑक्सिजन’ या उपक्रमातून डोनेशन स्वीकारायला सुरुवात केली आहे. झोमॅटो अॅपमध्ये हे आता लाइव्ह असून तुम्ही १००, १००० किंवा २००० रुपये दान करू शकता. तर वेबसाइटद्वरे तुम्ही कोणतीही रक्कम दान करण्यासाठी निवडू शकता. झोमॅटो डेल्हीवरी सोबत रुग्णालयांना तसेच गरजू कुटुंबांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सचा स्रोत म्हणून काम करत आहे. झोमॅटोच्या फीडिंग इंडियाला ऑक्सिजनची मदत पुरवण्याकरिता ५० कोटी रुपयांपर्यंतचा निधी उभारायचा आहे.


Back to top button
Don`t copy text!