दैनिक स्थैर्य | दि. 20 एप्रिल 2023 | फलटण | फलटण बाजार समितीचा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ८१ अर्ज माघारी घेण्यात आले आहेत. बाजार समितीच्या १८ जागांमधील ४ संचालक हे बिनविरोध निवडून गेले आहेत तर १४ जागांसाठी २४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
– बिनविरोध निवडून गेलेले संचालक पुढील प्रमाणे –
अक्षय गायकवाड – ग्रामपंचायत अनुसूचित जाती मतदारसंघ (राष्ट्रवादी काँग्रेस)
निलेश कापसे – हमाल मापाडी मतदारसंघ (राष्ट्रवादी काँग्रेस)
तुळशीदास शिंदे – सोसायटी इतर मागास मतदारसंघ (राष्ट्रवादी काँग्रेस)
संतोष जगताप – ग्रामपंचायत आर्थिक मागास मतदारसंघ (राष्ट्रवादी काँग्रेस)
– सोसायटी सर्वसाधारण मतदारसंघातील उमेदवार पुढील प्रमाणे –
नाईक निंबाळकर श्रीमंत रघुनाथराजे विक्रमसिंह (राष्ट्रवादी काँग्रेस), होळकर भगवान दादासो (राष्ट्रवादी काँग्रेस), शिंदे चेतन सुभाष (राष्ट्रवादी काँग्रेस), सस्ते निशिगंध आत्माराम, पाटील शंभुराज विनायक (राष्ट्रवादी काँग्रेस), सरक खंडेराव पांडुरंग (राष्ट्रीय समाज पक्ष), लोखंडे शरद लक्ष्मण (राष्ट्रवादी काँग्रेस), गावडे ज्ञानदेव बाबासो (राष्ट्रवादी काँग्रेस), गौंड दिपक विठोबा (राष्ट्रवादी काँग्रेस), माने विक्रम रामचंद्र, लेाखंडे शंकर आत्माराम (राष्ट्रीय काँग्रेस पक्ष)
– सोसायटी विजाभज मतदारसंघातील उमेदवार पुढील प्रमाणे –
खताळ भिमराव पोपटराव (राष्ट्रवादी काँग्रेस), इवरे नानासो पोपट (शिवसेना)
– सोसायटी महिला मतदारसंघातील उमेदवार पुढील प्रमाणे –
रणवरे सुनिता चंद्रकांत (राष्ट्रवादी काँग्रेस), सस्ते जयश्री गणपत (राष्ट्रवादी काँग्रेस), कुलाळ शितल महादेव
– ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातील उमेदवार पुढील प्रमाणे –
झणझणे प्रदिप हरिभाऊ (शिवसेना – उद्धव ठाकरे), शेवते काशिनाथ साधु (राष्ट्रीय समाज पक्ष), शिंदे किरण सयाजी (राष्ट्रवादी काँग्रेस), शिंदे रविंद्र आमराव, खरात चांगदेव कृष्णा (राष्ट्रवादी काँग्रेस)
– व्यापारी – आडते मतदारसंघातील उमेदवार पुढील प्रमाणे –
ननावरे बाळासाहेब दयाराम, कदम संजय हरिभाऊ (राष्ट्रवादी काँग्रेस), जाधव समर दिलीप (राष्ट्रवादी काँग्रेस)