निंभोरे गावच्या विकास कामांबाबत कमी पडणार नाही : उपसरपंच मुकुंद रणवरे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण दि.19 : ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निंभोरे गावात सर्वसमावेशक कामे होणार आहेत. जिथे निधीची कमतरता पडेल तेथे आम्ही स्वखर्चातून कामे पूर्ण करीत आहोत. गावाच्या विकास कामांत निंभोरे ग्रामपंचायत कुठेच कमी पडणार नाही, अशी ग्वाही निंभोरेचे उपसरपंच मुकुंदराव रणवरे यांनी दिली.

निभोंरे (बांदलवस्ती) येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेत ग्रामस्थांची आपुलकीने विचारपुस करून कोरोना विषयी जनजागृती करताना मुकुंदराव रणवरे बोलत होते. यावेळी सरपंच सौ.कांचनताई निंबाळकर, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मदने, युवा ग्रामपंचायत सदस्य सनी मदने, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष अभिजित निंबाळकर, तालुका उपाध्यक्ष निरंजन पिसाळ, कुंडलिक माडकर, करीम शेख, पांडुरंग माने, स्वप्निल अडसूळ, हरीभाऊ भिसे, महेश जमदाडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी मुकुंदराव रणवरे पुढे म्हणाले, नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत ग्रामस्थांच्या साथीने राजे गटाला अभूतपूर्व यश मिळाले आहे. ग्रामस्थांना दिलेल्या आश्‍वासनांच्या पूर्तीसाठी निवडणुकीनंतर ग्रामपंचायत निंभोरे यांनी विकासकामांचा झंझावात कायम सुरू ठेवला आहे.

यावेळी सनी मदने यांनी गणपती मंदीर येथील पेव्हर ब्लॉक,स ांडपाण्याच्या व्यवस्थेसाठी आवश्यक असणार्या सिमेंट पाईप, विद्युत खांबावरील बल्ब इ.प्रश्‍न निदर्शनास आणून दिले. सदर समस्या लवकरच सोडवण्याचे आश्‍वासन यावेळी मुकुंदराव रणवरे यांनी दिले.


Back to top button
Don`t copy text!