कास सांडव्याच्या पायऱ्यांवर होणार पर्यटकांची गर्दी ? पालिकेने नाममात्र शुल्क आकारण्याची प्रवीण पाटील यांची सूचना

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १३ जुलै २०२२ । सातारा । सातारा शहराची लाईफ लाईन असणाऱ्या कास धरणाच्या सांडव्याचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे . या 51 फुटी सांडव्याच्या बाजूने पायऱ्या बसवण्यात आल्या असून त्या सांडव्यावरून पाणी वाहण्यास काही दिवस शिल्लक आहे . पालिकेने हा स्पॉट पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकसित करावा आणि त्यांच्याकडून नाममात्र शुल्क करावे अशी मागणी नगर विकास आघाडीचे माजी स्वीकृत नगरसेवक प्रवीण पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले, ” 27 फेब्रुवारी 2015 रोजी सातारा पालिकेच्या झालेल्या अर्थसंकल्पीय सभेमध्ये कास धरणाच्या सांडलेला प्रमाणित पायऱ्यांची रचना करून पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पर्यटकांना तेथे पाण्यात भिजण्याची नाममात्र शुल्कात संधी मिळावी अशी सूचना प्रवीण पाटील यांनी केली होती . तब्बल सात वर्षांनंतर प्रवीण पाटील यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे जलसंपदा विभागाने धरणाच्या सांडव्यालगत पायऱ्या तयार केल्या असून सध्या धरणाची पाणी पातळी ही 36 फुटावर पोहोचली आहे पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास या पायऱ्या वरून पाणी वाहण्यास पहिल्यांदाच सुरुवात होणार आहे या गोष्टीचा मला आती आनंद होत आहे अशी भावनिक प्रतिक्रिया प्रवीण पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हा स्पॉट नगरपालिकेने पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकसित करावा तसे केल्यास पर्यटक येथे मोठ्या संख्येने येतील आणि तेथे स्थानिकांना रोजगारही मिळेल व पालिकेने यासंदर्भात पर्यटकांच्या सुरक्षिततेचा पूर्णतः विचार करून त्यांना माफक शुल्क आकारावे अशी सूचना त्यांनी केली.

धरणाची उंची तब्बल 51 फूट असून धरणाची काम सध्या 90 टक्के झाले आहे सांडव्याच्या पुढील बाजूस काही ठिकाणी टिचिंग चे काम शिल्लक राहिले आहे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अथक प्रयत्नातून व पाठपुरावा यातून ही योजना साकारली गेली आणि यामध्ये मी केलेल्या एका सूचनेचा स्वीकार करून तशी रचना जलसंपदा विभागाने केली याचे मला अतिव समाधान असल्याची प्रतिक्रिया प्रवीण पाटील यांनी दिली कासच्या पावसाळी पर्यटनाचा एक नवीन टुरिस्ट स्पॉट यानिमित्ताने विकसित होणार आहे स्थानिकांना रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून पालिकेने या प्रस्तावाचा जरूर विचार करावा अशी मागणी प्रवीण पाटील यांची होती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मला मनोमिलन च्या काळात पाच वर्ष स्वीकृत नगरसेवक म्हणून मला कामाची संधी दिली व पाणीदार नगरसेवक म्हणून मला काम करता आले याचे मला अतिव समाधान असल्याचे प्रवीण पाटील यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!