
दैनिक स्थैर्य । दि.२१ जानेवारी २०२२ । सातारा । खंडाळा तालुका शेतकरी साखर कारखाना व किसन वीर साखर कारखान्याच्या अध्यक्ष पदाधिकारी व संचालक मंडळाची आजही भेट नाही झाली. खंडाळा कारखाना सुरू करा अन्यथा करार संपुष्टात आणा यासाठी खंडाळा कारखान्याच्या संचालक मंडळाने मागणी करूनही आज भेट नाही.
किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना व खंडाळा तालुका शेतकरी साखर कारखाना हा भागीदारी तत्त्वावर सहकारात उभारलेला राज्यातील पहिलाच प्रकल्प आहे. खंडाळा कारखाना उभारल्यापासून या कारखान्याचे फार कमी कालावधीसाठीच गाळप झालेले आहे. मागील दोन तीन महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत खंडाळा तालुका शेतकरी साखर कारखान्याचे व्यवस्थापन बदलले आहे. भागीदारी कराराप्रमाणे हा कारखाना किसन वीर व्यवस्थापनाने सुरु करावा, अशी मागणी खंडाळा कारखान्याच्या व्यवस्थापनाने किसन वीर व्यवस्थापणाकडे केली आहे. मात्र, यावेळी किसन वीर, खंडाळा व प्रतापगड हे सर्व कारखाने बंद आहेत. खंडाळा कारखान्याच्या व्यवस्थापनाने मागील तीन महिन्यांमध्ये किसनवीरच्या व्यवस्थापनाबरोबर बैठकीसाठी अनेकदा प्रयत्न केले,पत्रव्यवहारही केला. मात्र बैठक होऊ शकली नाही. दि १ जानेवारी रोजी खंडाळा कारखान्याच्या संचालक मंडळ आणि किसन वीर व्यवस्थापनाकडे कारखाना सुरू करण्यासंदर्भातील चर्चेबाबत वेळ मागितली होती. मात्र अशी वेळ किसनवीर च्या व्यवस्थापनाकडून देण्यात आली नाही.त्यामुळे या आठवड्यामध्ये चार दिवसानंतर खंडाळ्याचे सर्व संचालक आणि अधिकारी किसनवीर कारखान्यावर येत असल्याने आपण याबाबत चर्चेसाठी कारखान्यावर उपस्थित राहावे अशी विनंती खंडाळा कारखान्याच्या अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक मंडळाच्या व्यवस्थापनाकडे केली होती. आज ज्याप्रमाणे आज सर्व जण या ठिकाणी उपस्थित राहिले. परंतु किसनवीर कारखान्यावर कोणीही जबाबदार अधिकारी पदाधिकारी उपस्थित नव्हते .त्यामुळे याबाबत चर्चा होऊ शकली नाही असे खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष व्ही जी पवार यांनी सांगितले.
खंडाळा कारखाना सुरू करण्यामध्ये कारखान्यावरील भागीदारी करारातील काही मुद्द्यांचा अडसर आहे. किसन वीर कारखान्याने खंडाळा कारखाना १९ वर्षासाठी भाडेतत्त्वावर घेतलेला असल्यामुळे त्यांनी प्रथम आणि चालू करणे गरजेचे आहे. जर ते चालू करू शकत नसतील तर त्यांनी याबाबतची चर्चा करून या कारखान्याकडे त्यांनी किती गुंतवणूक केली आहे. कारखाना कसा सुरु करता येईल याबाबतची चर्चा दोन्ही कारखान्याच्या व्यवस्थापनाकडून आवश्यक आहे .परंतु अशी चर्चाच होत नाही व कारखाना सुरु करत नाही.सध्या वाई व खंडाळा तालुक्यामध्ये बारा-तेरा लाख उसाचा ऊस टन ऊस क्षेत्र शिल्लक आहे. शेतामध्ये वीस महिने ऊस उभा असून उसाला आता तुरी आले आहेत.ऊस गाळपा अभावी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. कारखाना व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांचे हित जपले पाहिजे. मात्र असे होताना दिसत नाही. आमची किसन वीर साखर कारखान्याला सहकार्य करण्याची इच्छा आहे. त्यासाठी वाट्टेल ती मदत करून आम्ही करायला करण्यात तयार आहोत. परंतु त्यांनी कारखाना सुरू करावा किंवा करार मोडून आम्हाला कारखाना सुरू करण्यामध्ये मदत करावी.याबाबत योग्य ती चर्चा व मार्ग काढणे टाळले जात आहे. आज कारखान्याचे सर्व संचालकांनी किसन वीर कारखान्यावर भेट देऊनही भेट होऊ शकली नाही.याबाबत साखर आयुक्त,सहकार मंत्र्यांशी संपर्क साधणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आपण खंडाळा कारखाना उभारणीसाठी जी रक्कम किसन वीरने उभारली आहे. त्याचा हिशोबही आपण देत नाही. तसेच कारखाना चालू करण्याबाबत काय नियोजन आहे. कारखान्यातील सुरक्षा व्यवस्थेची कमतरता असल्याने वस्तूंची चोरीची दाट शक्यता आहे. वीज बील न भरल्याने वीज पुरवठा खंडीत केला आहे तो पुन्हा कार्यान्वीत करणे, कामगारांचे व सुरक्षारक्षकांचे पगार रखडलेले आहेत तसेच सदर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सभासद शेतक-यांचा ऊस रखाडला आहे. त्याची तोड करण्याबाबत आपले धोरण काय, खंडाळा कारखान्याच्या पेट्रोल पंपाची उधारीची रक्कम जमा करणेबाबत तसेच खंडाळा कारखाना उभारणीसाठी आपण किती खर्च केला याच्या माहितीसाठी आपणाकडे वेळ व दिवस मागितला असता आपण कोणताच प्रतिसाद दिला नाही. दूरध्वनीवरून कार्यकारी संचालकांच्या सोबत झालेल्या चर्चेनुसार तीन ते चार दिवसात कारखाना चालू करणार आहोत. तुम्हाला चर्चेसाठी बोलवणार आहोत असे सांगण्यात आले.मात्र काही कारवाई नाही असे पवार यांनी सांगितले.